Directions In Marathi: नमस्कार मित्रांनो आजच्या directions in marathi या पोस्ट मध्ये आपले स्वागत आहे. आधीच्या काळी लोक प्रवास करण्यासाठी दिशे वर अवलंबून होते.
कारण त्यावेळी रस्ते, हायवे, GPS नसायचे म्हणून त्यावेळेचे लोक हे प्रवास करत असताना सोबत होकायंत्र म्हणजेच compass सोबत ठेवायचे. होकायंत्राच्या (Compass) च्या साह्याने ते जंगल आणि समुद्रातून वाट काढत त्यांच्या निश्चित ठिकाणी जात असे.
ज्यांच्या कडे होकायंत्र नसायचे ते लोक दिवसा सूर्य आणि रात्री चांदण्याच्या साह्याने दिशा ओळखून आपला प्रवास करायचे. सूर्य आणि चांदण्या यांच्या साह्याने दिशा कसे ओळखायचे हे ही मी या पोस्ट मध्ये सांगणार आहे
या पोस्ट मध्ये आम्ही शाळकरी विध्यार्थी, पोलीस भरती आणि स्पर्धा परीक्षा ची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रमुख दिशा कोणत्या? उप दिशा कोणत्या आणि दहा दिशा कोणत्या? आहेत आणि त्यांची थोडक्यात माहिती देणार आहे.
मित्रानो आम्ही या पोस्ट मध्ये दिशांची मराठी मध्ये नावे आणि इंग्रजी मध्ये त्यांना काय म्हणतात हे ही आम्ही खाली सांगितले आहे चला तर सुरू करूया directions in marathi.
Table of Contents
मराठी दिशा (Directions In Marathi)
मित्रानो 4 मुख्य दिशा आहेत आणि 4 उपदिशा आहेत. प्रमुख दिशा आणि उपदिशा मिळून आठ दिशा कोणत्या त्या आपण पाहुत.
- प्रमुख चार दिशा (4 directions in marathi): उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम या आपल्या चार प्रमुख दिशा आहेत.
- उपदिशा: ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य हे आपल्या 4 उपदिशा आहेत.
- Also Read: Taras Animal Information In Marathi
- Also Read: Banyan Tree In Marathi
8 Directions In Marathi
Directions Names In Marathi (दिशांचे नावे मराठी ) | Directions Names In English |
---|---|
उत्तर | North |
दक्षिण | South |
पूर्व दिशा | East |
पश्चिम | West |
आग्नेय दिशा | Southeast |
ईशान्य दिशा | Northeast |
वायव्य दिशा | Northwest |
उत्तर ईशान्य | North-northeast |
प्रमुख दिशा कसे ओळखायचे?
- ज्या दिशेने सूर्य उगवतो ती दिशा म्हणजे पूर्व दिशा.
- पूर्व दिशेच्या समोरची दिशा म्हणजे पश्चिम दिशा पश्चिम दिशेला सूर्य मावळतो.
- पूर्व दिशेच्या डाव्या बाजूची दिशा दक्षिण आहे.
- पूर्व दिशेच्या उजव्या बाजूची दिशा म्हणजे उत्तर दिशा आहे.
उप दिशा कसे ओळखायचे?
आता तुम्हाला कळाले असेल की प्रमुख दिशा कसे ओळखायचे आता पाहू उपदिशा कसे ओळखायचे.
- उत्तर आणि पूर्व दिशेच्या मध्ये जी दिशा आहे ती दिशा म्हणजे ईशान्य दिशा.
- पूर्व आणि दक्षिण दिशेच्या मध्ये आग्नेय दिशा आहे.
- दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या मध्ये असलेल्या दिशेला नैऋत्य दिशा असे म्हणतात.
- उत्तर आणि पश्चिम दिशा मध्ये असलेल्या दिशेला वायव्य दिशा असे म्हणतात.
10 Directions In Marathi
तुम्हाला 8 दिशांची माहिती तर झालीच असेल पण जोतिष शास्त्र नुसार आपल्या दहा दिशा आहेत आकाश आणि पातळ या दोन दिशा जोडून आपल्या कडे एकूण दहा दिशा आहेत.
सर्व दिशांबद्दल ची थोडक्यात माहिती (Directions Information In Marathi)
इथे मी आपल्या सर्व दिशांची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
उत्तर दिशा (north direction in marathi)
उत्तर दिशा ही महत्व पूर्ण दिशा आहे. पूर्व दिशेच्या उजव्या बाजूच्या दिशेला उत्तर दिशा असे म्हणतात. होकायंत्र (compass) हे उत्तर दिशा दर्सवतो. रात्री च्या वेळी धुर्वतारा हा उत्तरे कडे असल्यामुळे आपल्याला रात्री आपण कोणत्या दिशेने जात आहोत हे समजते. श्रीमंतीचे देवता कुबेर या दिशेचे दिगपाल आहेत.
दक्षिण दिशा (South Direction In Marathi)
दक्षिण दिशा पूर्व दिशेच्या डाव्या बाजूला असलेली दिशा आहे. दक्षिण दिशेकडे केरळ राज्य आहे आणि हिंदू जोतिष शास्त्रानुसार दक्षिण दिशेचे दिगपाल गे यमदेव आहेत.
पूर्व दिशा (East Direction In Marathi)
ज्या दिशेने सूर्य उगवतो ती दिशा म्हणजे पूर्व दिशा होय. पूर्व दिशेला भारताचे अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा हे राज्य आहेत. आणि पूर्व दिशेचे दिगपाल हे इंद्र देव आहेत.
पश्चिम दिशा (West Direction In Marathi)
पश्चिम दिशेला सूर्य मावळतो. आणि पश्चिम दिशेला भारताचे गोवा, गुजरात, महाराष्ट्र, दादर नगर हवेली आणि दमन दिव हे राज्य आहेत. पश्चिम दिशेचे दिगपाल वरुण देव आहेत.
आपण मुख्य दिशांची माहिती घेतली आता आपण उपदिशांची माहिती घेणार आहोत.
ईशान्य दिशा (NorthEast Direction In Marathi)
ईशान्य दिशा उत्तर आणि पूर्व दिशेच्या मध्ये येते. या दिशेचे दिगपाल भगवान शिव आहेत.
आग्नेय दिशा (SouthEast Direction In Marathi)
आग्नेय दिशा दक्षिण आणि पूर्व दिशा च्या मध्ये असलेली दिशा आहे. या दिशेला इंग्रजी मध्ये SouthEast असे म्हंटले जाते.
नैत्रत्य दिशा (SouthWest Direction In Marathi)
दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या मध्ये जी दिशा येते त्या दिशेला नैत्रत्य दिशा असे म्हणतात. आणि इंग्रजी मध्ये SouthWest असे म्हणतात.
वायव्य दिशा (NorthWest Direction In Marathi)
उत्तर आणि पश्चिम दिशे मध्ये असलेल्या दिशेला वायव्य दिशा असे म्हणतात. वायव्य दिशेचे दिगपाल हे पवन देव हे आहेत. इंग्रजी मध्ये वायव्य दिशेला NorthWest असे म्हणतात.
जोतिषशास्त्रानुसार या आठ दिशा व्यतिरिक्त आणखी दोन दिशा आहेत त्या आपण पाहुयात.
आकाश
जोतिषशास्त्रात आकाशला पण दिशा मानले गेले आहे आणि या दिशेचे दिगपाल हे ब्रम्हदेव आहेत.
पातळ
जोतिषशास्त्रानुसार पाताळचे दिगपाल हे शेषनाग हे आहेत.
Direction In Marathi FAQ
येथे आम्ही जास्त वेळा विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांचे उत्तरे दिले आहेत.
Direction Meaning In Marathi
direction meaning in marathi: मराठी मध्ये direction ला दिशा असे म्हणतात.
Sun Rises From Which Direction In Marathi?
सूर्य हा पूर्व दिशेने उगवतो आणि पश्चिम दिशेला मावळतो.
निष्कर्ष
मंडळी आम्ही directions in marathi या पोस्ट मध्ये दिशांची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही तुम्हाला प्रत्येक दिशेची माहिती वरी दिली आहे.
आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल. जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रमंडळी सोबत नक्की शेअर करा. आणि अश्या आणखी पोस्ट्स साठी आमच्या ब्लॉग ला बुकमध्ये सेव करून ठेवा. जय हिंद जय महाराष्ट्र.