एक वचन अनेक वचन (Ek Vachan Anek Vachan) | वचन व त्याचे प्रकार (मराठी व्याकरण)

नमस्कार आपले स्वागत आहे www.majhipolicebharti.com वर. आज या पोस्ट मध्ये आपण एक वचन अनेक वचन (ek vachan anek vachan) बद्दल ची सर्व माहिती दिली आहे.

या पोस्ट मध्ये मी तुम्हाला ek vachan anek vachan pdf, एक वचन अनेक वचन तक्ता आणि उदाहरणे देणार आहे. परीक्षेत तुम्हाला या वर नक्की प्रशन येतात.

तुम्हाला ek vachan anek vachan बद्दल कसलीच माहिती नसेल तर मी खात्री घेऊन सांगतो की तुम्ही ही पोस्ट वाचल्या नंतर तुम्हा कसलीच अडचण येणार नाही.

एक वचन अनेक वचन (Ek Vachan Anek Vachan)

Ek Vachan Anek Vachan

मित्रानो मराठी व्याकरण (marathi grammar) मधील ek vachan anek vachan वर परीक्षेत तुम्हाला हमखास प्रशन येणार हे तुम्हाला मी खात्रीशीर पणे सांगतो. तस पण हा विषय खुप अवघड नाही.

तुम्हाला फक्त एक वचन आणि अनेक वचन म्हणजे काय? हे समजले की झाले तुम्ही कोणतेही शब्द ओळखू शकता की कोणता शब्द एक वचनी आहे आणि कोणता शब्द अनेक वचनी.

चला तर सर्वात अगोदर समजून घेऊया वचन म्हणजे काय?

वचन म्हणजे काय?

वचन म्हणजे: वस्तू एक आहेत की अनेक हे सूचित करण्यासाठी वापरलेल्या गुणधर्मास व्याकरणात वचन असे म्हणतात.

जो शब्द सर्वनाम, संज्ञा, क्रियापद, विशेषण यांच्या संख्येविषयी एक, दोन, तीन, चार इ. माहिती देतो त्यास ‘वचन’ (Vachan In Marathi) असे म्हटले जाते.

आता तुम्हाला वचन म्हणजे काय? हे समजले असेल. चला तर आता पाहूया वचन चे किती प्रकार आहेत.

वचन चे किती प्रकार आहेत?

मित्रांनो तुम्हाला वचन म्हणजे काय हे समजलेच आहे. आता तुम्हाला वचन चे किती प्रकार आहेत हे सांगतो. वचन चे दोन प्रकार आहेत. ते पुढीलप्रमाणे

  • एक वचन 
  • अनेक वचन

आता आपण पाहूया या दोन प्रकाराबद्दल ची माहिती.

एक वचन (Ek Vachan In Marathi)

ज्या शब्दा पासून फक्त एका व्यक्तीची किंवा एका वस्तूचाच बोध होतो त्यास एक वचन असे म्हणतात. आता काही एक वचन चे उदाहरणे पाहू: मुलगी, गाय, सैनिक, कपाट, झाड, फुल, मुलगा, माकड, टोपी इत्यादी.

अनेक वचन (Anek Vachan In Marathi)

ज्या शब्दापासून अनेक व्यक्ती व अनेक वस्तूंचा बोध होतो त्यास अनेक वचन असे म्हणतात.

अनेक वचन ची काही उदाहरणे: मुली, मुले, झाडे, फुले, पुस्तके, वह्या, सुपाऱ्या, दुकाने इत्यादी.

आता तुम्हाला एक वचन अनेक वचन माहिती झालेच असेल. आता मी तुम्हाला या दोघांचा एक तक्ता बनवला आहे. एक वचन अनेक वचन तक्ता मध्ये तुम्हाला एकाच शब्दाला एक वचन आणि अनेक वचन मध्ये कसे लिहतात व बोलतात हे सांगितले आहे.

पुल्लिंगी शब्दांचे एकवचन अनेकवचन

येथे मी तुम्हाला फक्त पुरुष लिंगी वचन चा तक्ता बनवला आहे.

एक वचन (Ek Vachan)अनेक वचन (Anek Vachan)
अंगरखाअंगरखे
आंबाआंबे
ओटाओटे
ओढाओढे
अभ्राअभ्रे
अंगठाअंगठे
उकिरडाउकिरडे
कायदाकायदे
कोळसाकोळसे
काटाकाटे
कोपराकोपरे
किनाराकिनारे
कोल्हाकोल्हे
कोळसाकोळसे
कांदाकांदे
खांदाखांदे
खड्डाखड्डे
गुन्हागुन्हे
गोठागोठे
गोळागोळे
गुडघागुडघे
गळागळे
घोडाघोडे
चुल्हाचुल्हे
चेहराचेहरे
चिमटाचिमटे
झोकाझोके
झराझरे
टांगाटांगे
टिळाटिळे
ठिपकाठिपके
डोळाडोळे
डबाडबे
जिल्हाजिल्हे
ढिगाराढिगारे
तुकडातुकडे
ताशाताशे
तालुकातालुके
तवातवे
दिवादिवे
देखावादेखावे
दाणादाणे
दागिनादागिने
दवाखानादवाखाने
दरवाजादरवाजे
धंदाधंदे
धागाधागे
धबधबाधबधबे
धडाधडे
निखारानिखारे
नालानाले
नकाशानकाशे
नमुनानमुने

स्त्रीलिंगी शब्दांचे एकवचन अनेकवचन

एकवचनअनेकवचन
हाकहाका
सूनसुना
वीटविटा
वीजविजा
वेळवेळा
वाटवाटा
लाटलाटा
रांगरांगा
मौजमौजा
मिरवणूकमिरवणुका
मोटमोटा
मानमाना
माळमाळा
बंदूकबंदुका
बागबागा
फौजफौजा
नजरनजरा
तारीखझोपा
झोपझोपा
झुळूकझुळका
चिंचचिंचा
जीभजिभा
जखमजखमा
चूकचुका
खूणखुणा
काचकाचा

Ek Vachan Anek Vachan PDF Download

मित्रानो Ek Vachan Anek Vachan Pdf Download करण्यासाठी वरी दिलेल्या प्रत्येक तक्त्याच्या खाली दिलेल्या download pdf button वर क्लीक करून pdf download करू शकता.

NameEk Vachan Anek Vachan PDF BY- majhipolicebharti.com
Size1MB
DownloadClick Here

निष्कर्ष

मित्रांनो मी तुम्हाला ek vachan anek vachan बद्दल सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तुम्हाला ek vachan anek vachan pdf ही दिली आहे.

तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर मित्रमंडळी सोबत नक्की शेअर करा. जय हिंद जय महाराष्ट्र.

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 4.3 / 5. Vote count: 95

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Comment

error: Content is protected !!