तुम्हाला पोलीस भरती ची संपूर्ण माहिती (Police Bharti Sampurn Mahiti) या आर्टिकल मध्ये दिली आहे या आर्टिकल मध्ये पोलीस भरती साठी कोणत्या विषयांचा अभ्यास करावा ? पोलीस भरती साठी किती वय लागते ? पोलीस भरती कधी आहे ? आधी लेखी होणार की मैदानी
अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे या आर्टिकल मध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही हे आर्टिकल पूर्ण वाचा जनेकरन तुम्हाला कुठलीच शनका राहणार नाही.
Table of Contents
पोलीस भरतीची संपूर्ण माहिती

पोलीस भरती साठी अर्ज करताना जिल्हा निवडावा लागतो ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज करणार आहोत त्या ठीकानी तुम्हाला लेखी आणि मैदानी द्यावी लागेल म्हणून योग्य जिल्हा निवडावा
खाली तुम्हाला पोलीस भरती साठी शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे इतर माहिती दिली आहे.
शैक्षणिक पात्रता निकष
12 वि उत्तीर्ण
शारीरिक पात्रता निकष
पोलीस भरती साठी लागणारे वय
- खुल्या प्रवर्गासाठी : 19 – 25
- आरक्षण : 19 – 35
- मराठा : 19 -35
पोलीस भरती साठी लागणारी उंची
- मुले 165 सेमी
- मुली : 155 सेमी
छाती
फक्त मुले : 79 सेमी फुगवून 5 सेमी जास्त.
पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- 10 वि 12 वीचे गुणपत्रिका व प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला (leaving certificate)
- महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र ( डोमेसाईल)
- ESBC, SC, ST, ओबीसी, VJ, NT साठी कास्ट सर्टिफिकेट
- विवाहीत स्त्री साठी लग्न झालेले असल्यास नावाचे गॅझेट कॉपी
- नॉन क्रिमेलीयर सर्टिफिकेट
- MSCIT CERTIFICATE
वरील पात्रतेची महाराष्ट्रातील मुले व मुली पोलीस भरतीसाठी अर्ज करू शकतील.
पोलीस भरती अभ्यासक्रम
मराठी व्याकरण ( 25 मार्क )
बुद्धिमत्ता चाचणी ( 25 मार्क )
गणित ( 25 मार्क )
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी ( 25 मार्क )
वरील विषयाची तयारी करण्यासाठी आम्ही 10 प्रश्नांची ऑनलाईन टेस्ट घेतो टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या बटनावर क्लीक करा
लेखी परीक्षा आधी होणार का मैदानी परीक्षा आधी होणार हे जो पर्यन्त शासनाचा जीआर येत नाही तो पर्यंत सांगता येनार नाही.
लेखी परीक्षा
लेखी परीक्षा ही 90 मिनिटांची असते यात 100 प्रश्न असतात प्रत्येकी प्रश्नाला 1 मार्क या प्रणाने लेखी परीक्षा 100 मार्कस ची असते
यात मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी या सर्व विषयांना प्रत्येकी 25 मार्क्स असतात या सर्व विषयात तुमचा चांगला अभ्यास पाहिजे.
- हे पन वाचा : Virudharthi Shabd In Marathi
- हे पन वाचा : Shabd Samuh Badal Ek Shabd
मैदानी परीक्षा
मित्रानो लेखी सोबत मैदानी परीक्षेची तयारी करणे ही खूप गरजेचे असते. मैदानी परीक्षा ही सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही घेतली जाऊ शकते त्यामुळे तुम्ही या तिन्ही वेळेत मैदानी परीक्षेचा सराव करावा.
धावणे
मुले
1600 मीटर : 5 मिनिटे 10 सेकेंद ( 30 गुण )
100 मीटर : 11.50 सेकेंद ( 10 गुण )
मुली
800 मीटर : 2 मिनटं 50 सेकेंद ( 30 गुण )
100 मीटर : 14 सेकेंद ( 10 गुण )
गोळा फेक
मुले
7.2 किलो चा गोळा 8.50 मीटर पेक्षा जास्त ( 10 गुण )
मुली
4 किलो वजनाचा गोळा 6 मीटर पेक्षा जास्त ( 10 गुण )
लांब उडी
मुले
5 मीटर
मुली
3.80 मीटर
पुल्प्स
फक्त मुले
10 पुल्प्स काढणे
वरील दिलेल्या माहितीत बदल होऊ शकतो. आम्ही हे आर्टिकल वेळोवेळी update करत आहोत
पोलीस भरती बद्दल तुमच्या मनात असलेले प्रश्न
पोलीस भरतीसाठी वयाची अट काय आहे ?
खुल्या प्रवर्गासाठी 19 – 25 वर्ष
आरक्षण 29 – 35 वर्ष
पोलीस भरतीसाठी उंची कती पाहिजे ?
मुलांसाठी : 165 सेमी
मुलींसाठी : 155 सेमी
पोलीस भरती केंव्हा होणार आहे ?
पोलीस भरती कधी होईल आत्ता सांगता येणार नाही पण डिसेंबर 2022 पर्यंत काही न काही बातमी मिळेल.
कोणत्या पदांसाठी भरती होणार आहे ?
पोलीस शिपाई , ड्राईव्हर आणि इतर पदांसाठी भरती होणार आहे
किती जागांसाठी भरती होणार आहे ?
शासना तर्फे अधिकृत माहिती आल्या शिवाय सांगता येणार नाही.
मित्रानो पोलीस भरती ची माहिती मी तुम्हाला माहिती दिली आहे तरी ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नातेवाईकां सोबत नक्की शेअर करा. जी माहिती दिली आहे त्यात वेळोवेळी बद्दल होऊ शकतो. धन्यवाद.