नमस्कार मित्रांनो तुमचे www.majhipolicebharti.com या वेबसाईटवर आपले स्वागत आहे, या पोस्ट मध्ये शब्दसमूहाबद्दल एक शब्द (Shabd Samuh Badal Ek Shabd) ची यादी आणि pdf या पोस्ट मध्ये दिली आहे. या पोस्ट मध्ये १०० हुन अधिक शब्दसमूहाबद्दल एक शब्द (Shabd Samuh Badal Ek Shabd) ची यादी खाली दिली आहे
Table of Contents
शब्दसमूहाबद्दल एक शब्द

शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे काय? हे आधी जाणून घेऊ शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे एका वाक्याचा एक शब्द उदाहरणात: ज्याला कधीही मरण नाही असा या वाक्याला एका शब्दात सांगायचे झाले तर, या वाक्याचा एक शब्द अमर असा होतो.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द यादी
- आईवडील नसणारा – अनाथ
- कायमचे लक्षात राहणारे – अविस्मरणीय
- कधीही न जिंकला जाणारा – अजिंक्य
- दगडावर कोरलेला लेख – शिलालेख
- पाण्याने चहूबाजूंनी वेढलेले – द्वीप
- विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा – वसतिगृह
- देवावर विश्वास ठेवणारा – आस्तिक
- लोकांचे नेतृत्व करणारा – नेता
- गुप्त बातम्या कढणारा – गुप्तहेर
- पंधरवड्यातून प्रसिद्ध होणारे – पाक्षिक
- अजिबात शत्रू नसणारा – अजातशत्रू
- मनास आकर्षून घेणारे – मनमोहक
- कलेची आवड असणारा – कलावंत
- दुसऱ्यावर उपकार करणारा – परोपकारी
- सत्याचा आग्रह धरणारा – सत्याग्रही
- संख्या मोजता न येणारा – असंख्य
- कानाला गोड वाटणारे – कर्णमधुर
- मिळूनमिसळून वागणारा – मनमिळाऊ
- महिन्यातून प्रसिद्ध होणारे – मासिक
- श्रम करून जगणारा – श्रमजीवी
- जे होणे अशक्य आहे – असंभव
- जे माहीत नाही ते – अज्ञात
- पसंत नसलेला – नापसंत
- दररोज प्रसिद्ध होणारे – दैनिक
- वर्षातून प्रसिद्ध होणारे – वार्षिक
- सतत द्वेष करणारा – दीर्घद्वेषी
- लोकांची वस्ती नसलेला भाग – निर्जन
- दगडासारखे हृदय असणारा – पाषाणहृदयी
- पाहण्यासाठी जमलेले लोक – प्रेक्षक
- सभेत धीटपणे बोलणारा – सभाधीट
- विक्री करणारा – विक्रेता
- रोज घडणारी हकीकत – दैनंदिनी
- देवळाच्या आतील भाग – गाभारा
- दुसऱ्यांना मार्गदर्शन करणारा – मार्गदर्शक
- गुरे बांधण्याची जागा – गोठा
- पाहिल्याबरोबर लगेच – प्रथमदर्शनी
- कधीही मृत्यू न येणारा – अमर
- चार रस्त्यांचा समूह – चौक
- काहीही माहेत नसलेला – अनभिज्ञ
- सर्व काही जाणणारा – सर्वज्ञ
- घोडे बांधण्याची जागा – पागा
- कहीही न शिकलेले – अशिक्षित
- झोपेच्या आधीन – निद्राधीन
- कोणतीही तक्रार न करता – विनातक्रार
- चहाड्या करणारा – चहाडखोर
- लहानापासून थोरांपर्यन्त – आबालवृद्ध
- जन्मापासून मरेपर्यन्त – आजन्म
- उपकार न जाणारा – कृतघ्न
- उपकार जाणणारा – कृतज्ञ
- आठवड्यातून प्रसिद्ध होणारे – साप्ताहिक
शब्दसमूहाबद्दल एक शब्द (Shabd Samuh Badal Ek Shabd) PDF
शब्दसमूहाबद्दल एक शब्द (Shabd Samuh Badal Ek Shabd) PDF डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या डाउनलोड बटन वर क्लीक करा.
RELATED POST
- 1000 समानार्थी शब्द मराठी | Samanarthi Shabd In Marathi [With PDF]
- विरुद्धार्थी शब्द मराठी | Virudharthi Shabd In Marathi [ With PDF]
- Police Bharti Question Paper 2018-2021 Pdf Download | Police Bharti Sarav Paper (Practice Paper) 2020-2021 Pdf Download
निष्कर्ष
या पोस्ट मध्ये आम्ही १०० हुन अधिक शब्दसमूहाबद्दल एक शब्द (Shabd Samuh Badal Ek Shabd) ची यादी आणि PDF दिली आहे. जर तुम्हाला या पोस्ट मध्ये काही चुका आढळल्या असतीनक्की ल तर कॉमेंट करून सांगा आम्ही त्वरित दुरुस्त करू. हि पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा.
All are very useful