समानार्थी शब्द मराठी 1000 | Samanarthi Shabd In Marathi [With PDF]

samanarthi shabd in marathi

नमस्कार मंडळी समानार्थी शब्द मराठी या पोस्ट मध्ये मराठी व्याकरण (marathi grammar) मधील महत्वाचे घटक म्हणजे samanarthi shabd … Read more

जाहिरात लेखन मराठी 8वी, 9वी,10वी 2023 | Jahirat Lekhan In Marathi नमुना, PDF Download For 9th, 10th Class

Jahirat Lekhan

नमस्कार 8वी, 9वी आणि 10वी च्या विद्यार्थी मित्रानो आज jahirat lekhan in marathi या पोस्ट मध्ये आपले स्वागत. … Read more

विरामचिन्हे व त्याचे प्रकार | Viram Chinh In Marathi 2023

Viram Chinh In Marathi

Viram Chinh In Marathi: नमस्कार मंडळी या पोस्ट मध्ये मराठी व्याकरणाचे महत्वाचे घटक Viram Chinh बद्दल संपूर्ण माहिती देणार … Read more

एक वचन अनेक वचन (Ek Vachan Anek Vachan) | वचन व त्याचे प्रकार (मराठी व्याकरण)

Ek Vachan Anek Vachan

नमस्कार आपले स्वागत आहे www.majhipolicebharti.com वर. आज या पोस्ट मध्ये आपण एक वचन अनेक वचन (ek vachan anek … Read more

[PDF सहित] अव्ययीभाव समास मराठी उदाहरणे 9वी, 10वी, 12वी | Avyayibhav Samas | Marathi Grammar

Avyayibhav Samas

नमस्कार मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणातील समास यावर 10 वी च्या मराठी च्या पेपर ला 2 गुणासाठी प्रश्न … Read more

[PDF सहित] समास मराठी व्याकरण 9वी, 10वी, 12वी साठी | समास व समासाचे प्रकार | Samas In Marathi

Samas In Marathi

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे www.rawneix.in  वर. आज या पोस्ट मध्ये मी तुम्हाला समास मराठी व्याकरण बद्दल … Read more

1001+ Vakprachar In Marathi | मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग 100

Vakprachar In Marathi

नमस्कार मित्रांनो Vakprachar In Marathi या पोस्ट मध्ये मी तुम्हाला मराठी वाक्प्रचार यादी देणार आहे. आणि सोबतच Marathi Vakprachar … Read more

१०००+ मराठीतील सर्व म्हणी | मराठी म्हणी Pdf (Marathi Mhani Pdf)

Marathi Mhani

Marathi Mhani: नमस्कार मित्रांनो Mpsc, Police Bharti आणि इतर स्पर्धा परीक्षा मध्ये येणाऱ्या सर्व Marathi Mhani या पोस्ट … Read more

1000+ विरुद्धार्थी शब्द मराठी | Virudharthi Shabd In Marathi [ With PDF]

विरुद्धार्थी शब्द मराठी व्याकरणा मधील महत्त्वाचे भाग आहे. Police Bharti, Mpsc आणि इतर परीक्षा मध्ये मराठी व्याकरणा मधील … Read more

[पत्र लेखन मराठी 9वी, 10वी] पत्राचे नमुने व माहिती | Patra Lekhan Marathi 2023

patra lekhan marathi

पत्र लेखन मराठी: नमस्कार विद्यार्थी मित्रानो तुम्हाला मराठी पत्र लेखन (patra lekhan marathi) येत नाही? तर काळजी करू नका patra lekhan in marathi ही पोस्ट वाचल्या नंतर तुम्हाला patra lekhan करण्यात काहीच अडचण येणार नाही.

मी तुम्हाला या पोस्ट मध्ये अगदी सोप्या भाषेत marathi patra lekhan कसे करायचे? हे सांगणार आहे. आणि तुम्हाला patra lekhan in marathi pdf ही देणार आहे. जनेकरून तुम्ही प्रिंट काढू शकाल.

पत्र लेखन हे मराठी उपयोजित लेखनाचे महत्वाचे भाग आहे.

मराठी पत्र लेखन (Letter Writing In Marathi)

patra lekhan in marathi | patra lekhan marathi

मित्रानो पत्र लेखन हे पत्र लेखन मराठी 9वी, 10 वी, 11वी आणि 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे कारण पत्र लेखन मराठी, हिंदी आणि इंग्रजी च्या पेपर मध्ये नक्की विचारले जाते.

मित्रानो आधी जसे पत्र लिहीत होतो तसे आता लिहायचे नाही कारण आता पत्र लेखनाचे pattern बदलले आहे. आता patra lekhan हे email format मध्ये लिहायचे आहे.

चला तर पाहूया E-mail format मध्ये पत्र लेखन कसे करायचे. ☺️

patra lekhana चे दोन प्रकार आहेत पहिले औपचारिक पत्र लेखन आणि दुसरे अनौपचारिक पत्र लेखन हे दोन प्रकार आहेत.

औपचारिक आणि अनौपचारिक पत्रलेखनात वापरले जाणारे संक्षेपाचे स्वरूप

patra lekhan marathi (औपचारिक आणि अनौपचारिक पत्रलेखनात वापरले जाणारे संक्षेपाचे स्वरूप)

पत्र लेखनाला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला संक्षेपाचे स्वरूप माहिती असणे गरजेचे आहे. खाली दिलेल्या टेबल मध्ये औपचारिक patra lekhanat वापरले जाणारे संक्षेपाचे स्वरूप आहेत.

श्रीम.श्रीमती
चि.चिरंजीव
श्री.श्रीयुत
स. न. वि. वि.सप्रेम नमस्कार विनंती विशेष.
शि. सा. न. वि. वि.शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष.
सा. न. वि. वि.साष्टांग नमस्कार विनंती विशेष.
ती.तीर्थरूप
सौ.सौभाग्यवती

आता पाहूया औपचारिक पत्र लेखन मराठी आणि नंतर अनौपचारिक पत्र लेखन मराठी. 😊

Read More: सामान्य ज्ञान (जनरल नॉलेज) प्रश्न उत्तरे 2023 | General knowledge Question In Marathi | Gk Questions In Marathi

औपचारिक पत्र लेखन मराठी

औपचारिक पत्र लेखन म्हणजे काय? तर मित्रानो!औपचारिक (OFFICIAL) पत्र हे मुख्याध्यापक, प्रिन्सिपल, संपादक, अधिकारी, company ला, कार्यालयातील व्यक्तीला आणि इतर यांना लिहले जाते अश्या पत्रांना औपचारिक पत्र असे म्हणतात .

औपचारिक पत्र लेखन मायना (Format Of Formal Letter)

औपचारिक पत्र लेखन | patra lekhan marathi

मी तुम्हाला येथे text, image आणि pdf format मध्ये औपचारिक पत्र लेखन आराखडा दिला आहे ते तुम्ही download करू शकता.

दि….जानेवारी 2022

प्रति,

मा. (पद)……………………………

…………..(हुद्दा, पत्ता)…………….

……………………………………….

विषय…………………………………………

महोदय,

……………………..……………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………….

पत्राचा शेवट

( पूर्ण नाव)

(पत्ता)

(ईमेल आयडी)

टीप: प्रश्न पत्रिकेत नाव आणि पत्ता दिला असेल तर तेच टाका. नसेल दिला तर तुम्ही स्वतःचे नाव आणि पत्ता टाकू शकता.

PDF Preview

औपचारिक पत्र लेखनाचे काही नमुने (Marathi Patra Lekhan Examples)

मित्रानो येथे आम्ही औपचारिक पत्र लेखनाचे काही नमुने आणि आराखडे दिले आहेत. पत्राचे pdf ही download करू शकता

मागणी पत्र लेखन

मित्रानो येथे आम्ही मागणी पत्र लेखनाचे काही नमुने आणि आराखडे दिले आहेत. मागणी पत्राचे pdf ही download करू शकता.

रसिक वाचक या नात्याने संबंधीत व्यक्तीला स्वतःसाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.

मागणी पत्र लेखन | patra lekhan marathi

दि. २ डिसेंम्बर २०२१

प्रति,

मा. व्यवस्थापक

अभिषेक पुस्तकालय

१०१ गंज गोलाई गाळा क्र.१ 

लातूर – ४१३५१२

        विषय : पुस्तकांच्या मागणी बाबत

महोदय,

स.न.वि.वि.

मी रसिक वाचक या नात्याने अभिषेक पुस्तकालय वर्धापनदिनानिमित्त तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते आपण वर्धापनदिनानिमित्त रसिक वाचकांसाठी २०℅ सवलत ठेवल्याबद्दल अभिनंदन मला माझ्या आवडीची काही पुस्तके हवी आहेत.

ती पुस्तके मी मागवू इच्छितो पुस्तकांची यादी तपशीलवारपणे सोबत जोडत आहे. कृपया मागवलेली सर्व पुस्तके लवकरात लवकर पाठवावी पुस्तकासोबत बिलही पाठवावे. आपण या पुस्तकावर योग्य अशी सवलत दयाल असा विश्वास आहे.

पुस्तकांची यादी खलील प्रमाणे आहे.

अनुक्रमांकपुस्तकाचे नावलेखकाचे नावप्रति
श्यामची आईसाने गुरुजी
ययातीवि.स. खांडेकर
नटसम्राटवि.वा. शिरवडकर
झोंबीआनंद यादव
अपूर्वाईपु.ल. देशपांडे

वरील पुस्तके वेळेत पाठवावी ही विनंती. 

आपली विश्वासू, 

मेघा गायकवाड

गोपाळ नगर.

ईमेल: megha@rawneix.in

PDF Preview

विनंती पत्र लेखन

मित्रानो आम्ही येथे काही विनंती पत्र चे नमुने दिले आहेत आणि तुम्ही खाली दिलेल्या विनंती पत्राचे pdf ही download करू शकता.

शाल्येय भांडार प्रमुख या नात्याने संबधित व्यक्तीला शाळेसाठी मागवलेल्या पुस्तकांवर अधिक सवलत देण्याविषयी विनंती पत्र.

४ डिसेंम्बर २०२१

प्रति,

मा. व्यवस्थापक,

अभि पुस्तकालय,

गाळा क्र. २

लातूर – ४१३५१२

विषय: पुस्तकावर अधिक सवलत देण्याबाबत.

महोदय ,

स.न.वि.वि.

आजच वर्तमानपत्रातून आलेले आपल्या पुस्तकालयाच्या वर्धापनदिनाबाबतचे पत्र वाचले. आणि आनंद झाला. वर्धापनदिनानिमित्त आपण पुस्तक खरेदीवर २०℅ सवलत जाहीर केली आहे.

आपले आनंद पुस्तकालय आणि आमची शाळा यांचे गेल्या अनेक वर्षाचे ऋणानुबंध आहे. गेली अनेक वर्ष आपण आमच्या शाळेला लागणारी सर्व प्रकार ची पुस्तके पुरवीत आला आहात.

सध्या पुस्तकांच्या किमती वाढल्या आहेत शाळेचे अनेक खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

शासनाकडून मिळणारे अनुदान वाढत्या खर्चाला पुरे पडत नाही. अली कडे देणग्या मिळणे सुद्धा जिकरीचे झाले आहे. म्हणून आपल्याला कळकळीची विनंती आहे की, आपण आपल्या वर्धापनदिनानिमित आमच्या शाळेला पुस्तक खरेदीवर २०℅ पेक्षा जास्त सवलत दयावी. आम्ही आमच्या पुस्तकाची यादी चार दिवसा आधी आपल्या कडे पाठवली आहे.

आपल्या अनुकूल प्रतिसादाची आम्ही वाट पाहत आहोत. सवलत वजा जाता येणारी देय रक्कम कृपया ई-मेल ने कळवावी म्हणजे ती रक्कम आम्ही आपल्या बँक खात्यात त्वरित जमा करू.

कळावे

आपला नम्र

अ.ब.क. 

शालेय भंडार प्रमुख

श्री लाल बहादूर शास्त्री विद्यालय

जुना औसा रोड लातूर – ४१३५१२

ई-मेल: contact@rawneix.in

PDF Preview

_______________________________________________

Read more

error: Content is protected !!