1001+ Vakprachar In Marathi | मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग 100

नमस्कार मित्रांनो Vakprachar In Marathi या पोस्ट मध्ये मी तुम्हाला मराठी वाक्प्रचार यादी देणार आहे. आणि सोबतच Marathi Vakprachar Arth Ani Vakyat Upyog कसे करायचे हे ही या पोस्ट मध्ये सांगणार आहे.

आणि तुम्ही 1001 मराठी Vakprachar ची यादी pdf स्वरूपात फ्री डाउनलोड करू शकता. Pdf डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला पोस्ट च्या शेवटी दिलेले डाउनलोड बटन वर क्लीक करायचे आहे आणि Vakprachar Pdf Download होण्यास सुरू होईल.

Vakprachar In Marathi

वाक्प्रचारामुळे भाषा सुंदर होते पण कमीत कमी शब्दांमुळे आपला आशय व्यक्त करण्याची सोय ही होते. वाक्प्रचार म्हणजे भाषेतील संप्रदाय एखाद्या सर्वपरिचिते लोककथेत एक संदर्भात आलेले एखादे वाक्य आपल्या वैशिष्ट्यामुळे भाषेत रूढ होऊन जाते. विशिष्ट शब्दहसमूहाला तो विशिष्ट अर्थ लक्षणेने कायमचा चिटकून बसतो. त्यास शब्दहसमूहाचा खरा अर्थ कोणताही असो पण लक्षणिक अर्थच रूढ होऊन जातो.

वाक्प्रचार म्हणजे काय ?

Vakprachar/Vakyaprachar म्हणजे काही शब्दसमूहांचा मराठी भाषेत वापर करताना त्यांचा नेहमीचा अर्थ न राहता, त्यांना दुसरा अर्थ प्राप्त होतो, त्यांना वाक्प्रचार म्हणतात.यालाच कोणी वाक्संप्रदाय असेही म्हणतात.

वाक्प्रचार परीक्षेच्या दृष्टीने का गरजेचे आहे?

विद्यार्थी मित्रांनो जे मूल-मुली शाळेत आहेत व हे police bhartimpsc, Psi sti, aso व अन्य इतर परीक्षेची तयारी करत असतील त्यांच्यासाठी वाक्प्रचार पाठ असणे महत्त्वाचे आहे.

कारण परीक्षेत खालील शब्दसमुहाचा वाक्यात उपयोग करा व खालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा अश्या प्रकारचे प्रश्न येतात तेव्हा तुम्हाला या प्रश्नांचे उत्तरे द्यायला आले पाहिजेत. कारण एक मार्कने तुम्ही यशस्वी होणार की अपयशी हे ठरते.

  • Also Read : Mul Sankhya
  • Also Read :  पोलीस भरती ची संपूर्ण माहिती

Marathi Vakprachar Free Pdf Download

Marathi Vakprachar Free Pdf Download करण्यासाठी खाली दिलेल्या Download लिंक वर क्लीक करा. Downloading  सुरू होईल.

Download

Vakprachar In Marathi List

अवसान गोळा करणे : धीर गोळा करणे.

वाक्य : शेवटी अवसान गोळा करून प्रणीतने सरांसमोर आपला गुन्हा कबूल केला.

Vakprachar In Marathi
अवगत असणे

अवगत असणे : माहित असणे.

वाक्य : आदिवासी स्त्रियांना टोपली विकण्याची कला अवगत असते.

अबाधित ठेवणे : बंधन न घालणे.

वाक्य : वडिलांच्या निधनानंतर राजाने शेतावरच हक्क अबाधित ठेवला.

अपशकुन मानणे : प्रतिकूल घडण्याचा संकेत मिळणे, वाईट शंका येणे.

वाक्य : आताच्या विज्ञाननिष्ठ जगात ‘ अपशकुन मानणे ‘ ह्या सारखी अंधश्रद्धा जोपासणे चुकीचे आहे.

अन्नास जागणे: उपकाराची आठवण ठेवणे.

अर्धचंद्र देणे: हकालपट्टी करणे.

अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे: थोड्याशा यशाने चढून जाणे.

vakprachar in marathi

अठराविश्वे दारिद्र्य असणे: पराकोटीचे दारिद्र्य असणे.

अंग काढून घेणे: संबंध तोडणे.

अंगाची लाही होणे: खूप राग येणे.

अग्निदिव्य करण: कठीण कसोटीला उतरणे.

अन्नास मोताद होणे: आत्यंतिक दारिद्र्यात जगणे.

अंगद धरणे: लठ्ठ होणे.

अडकित्त्यात सापडणे: पेचात सापडणे.

अमर होणे : चिरकाल नाव राहणे.

वाक्य : जे सैनिक देशासाठी लढून मृत्यू पावले, ते वीर अमर झाले.

अवगत करणे : माहित करून घेणे.

वाक्य : कल्याणीने इंग्रजी भाषा चांगलीच अवगत केली आहे.

अंगाचा तिळपापड होणे: अतिशय संताप येणे.

अंथरूण पाहून पाय पसरणे: एपती नुसार खर्च करणे.

अंगावर काटे उभे राहणे: भीतीने अंगावर शहारे येणे.

अंगावर मूठभर मांस चढणे: धन्यता वाटणे.

vakprachar in marathi

असंतोष निर्माण होणे : चीड येणे, एखाद्या गोष्टीबद्दल खूप नाराजी निर्माण होणे.

वाक्य : इंग्रजी राजवटीविरोधी भारतीय लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.

अभिप्राय देणे : मत देणे, प्रतिक्रिया करणे.

वाक्य : राजूने लिहिलेले पत्रलेखन चांगले आहे, असा सरांनी अभिप्राय दिला.

अलगद उचलणे : सावकाश उचलणे.

वाक्य : समीरने आपले पुस्तक अलगद उचलले.

अटक करणे : कैद करणे.

वाक्य : खूप प्रयत्नानंतर पोलिसांनी अखेर अट्टल चोरांना अटक केली.

अभिलाषा धरणे : एखाद्या गोष्टीची इच्छा बाळगणे.

वाक्य : आपल्या आवाक्यात नसलेल्या गोष्टीची कधीच अभिलाषा धरू नये.

अचूक वेध घेणे : न चुकता नेम साधणे.

वाक्य : नेमबाज अभिनव बिंद्रा ने लक्ष्याचा अचूक वेध घेतला.

अवाक होणे : आश्चर्यचकित होणे.

वाक्य : अचानक आकाशात उमटलेले इंद्रधनुष्य पाहून हर्षा अवाक झाली.

vakprachar in marathi

अढी नसणे : मनात डंख न ठेवणे, मनात किल्मिष न ठेवणे.

वाक्य : स्पष्ट बोलणे झाल्यामुळे मनीषच्या मनात मनोहरबद्दल कोणतीही अढी नव्हती.

अहोरात्र झटणे : रात्रंदिवस कष्ट करणे.

वाक्य : शेतकरी मातीतून पीकरूपी सोने पिकवण्यासाठी अहोरात्र झटत असतो.

अद्दल घडणे : शिक्षा करणे.

वाक्य : गजांआड टाकून पोलिसांनी चोरांना चांगलीच अद्दल घडवली.

अंगाला होणे: अंगाला छान बसणे.

vakprachar in marathi

अंगावर काटा येणे: भीती वाटणे.

अंगी ताठा भरणे: मग्रुरी करणे.

अट्टहास करणे: आग्रह धरणे.

अनभिज्ञ असते: एखाद्या विषयाचे मुळीच ज्ञान असणे.

अपूर्व योग येणे: दुर्मिळ योग येणे.

अप्रूप वाटणे: आश्चर्य किंवा कौतुक वाटणे.

अभंग असणे: अखंड असणे.

अभिलाषा धरणे: एखाद्या गोष्टीची इच्छा बाळगणे.

अमलात आणणे: कारवाई करणे.

अवाक होणे: आश्चर्यचकित होण.

vakprachar in marathi

अभंग असणे : एकसंध, अखंड असणे.

वाक्य : कितीही संकटे आली तरी भारतीयांची एकात्मता अभंग राहील.

अप्रूप वाटणे : आश्चर्य किंवा कौतुक वाटणे.

वाक्य : लहानगी नेहा चे मधुर गीत ऐकून श्रोत्यांना तिचे अप्रूप वाटते.

अशुभाची सावली पडणे : अमंगल घडणे, विपरीत घडणे.

वाक्य : लग्नानंतर लगेच चार महिन्यात विधवा झालेल्या राजश्रीवर जणू अशुभाची सावली पडली. ,(vakprachar in marathi)

अवलंब करणे : अंगीकारणे, स्वीकारणे.

वाक्य : गुरुजींनी दिलेल्या ज्ञानाचा सईने वेळेत अवलंब केला.

अर्धचंद्र मिळणे : हकालपट्टी होणे.

वाक्य : भ्रष्टाचार करणाऱ्यांना शासकीय सेवेतून ताबडतोब अर्धचंद्र मिळाला पाहिजे.

अर्ध्या वचनात राहणे : आज्ञेत राहणे.

वाक्य : आजच्या आधुनिक काळात, स्त्रीने पुरुषाच्या अर्ध्या वचनात राहावे, ही अपेक्षा करणे चुकीचे आहे.

अजरामर होणे : कायम स्मरणात राहणे.

वाक्य : ज्या वीर सैनिकांनी देशासाठी आपले प्राणार्पण केले, ते अजरामर झाले. (vakprachar in marathi)

अन्नान दशा होणे : उपासमारीची पाळी येणे.

वाक्य : महापुरामुळे उत्तराखंडातील शेकडो खेडेगावांतील लोकांची अन्नान दशा झाली आहे.

अवगत होणे : माहित होणे, कळणे, आकलन होणे.

वाक्य : चार दिवसांच्या अभ्यासाने रोनित ला कॉम्पुटर चालवण्याची कला अवगत झाली.

अचंबा वाटणे : नवल वाटणे, आश्चर्य वाटणे.

वाक्य : चार वर्षाच्या संगीताला सहजपणे संगणक चालवताना पाहून सर्वांनाच अचंबा वाटला.

अभिनंदन करणे : कौतुक करणे.

वाक्य : दहावीच्या परीक्षेत विद्यालयात पहिल्या आलेल्या केशवचे गुरुजींनी अभिनंदन केले. (vakprachar in marathi)

अवहेलना करणे : अपमान करणे, अनादर करणे.

वाक्य : चांगल्या माणसाचा अवहेलना करू नये.

अधीर होणे : उत्सुक होणे.

वाक्य : आजोबांनी नवीन आणलेल्या खेळणीशी खेळण्यासाठी पूर्वाचे मन अधीर झाले होते.

अपूर्व योग येणे : दुर्मीळ योग येणे.

वाक्य : परवा सूर्यग्रहण व चंद्रगहण एकाच दिवशी होण्याचा अपूर्व योग येणे आहे.

अमलात आणणे : कारवाई करणे.

वाक्य : पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी बरेच नियम अमलात आणले.(vakprachar in marathi)

आड येणे: अडथळा निर्माण करणे.

आकाशाची कुराड: आकस्मिक संकट.

आज लागणे: झळ लागणे.

आकाश ठेंगणे होणे अतिशय आनंद होणे

अटकेपार झेंडा लावणे फार मोठा पराक्रम गाजवला

अत्तराचे दिवे लावणे: भरपूर उधळपट्टी करणे.

आकाशाला गवसणी घालने: आवाक्याबाहेरची गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे.

आकाश पाटणे: चारी बाजूंनी संकटे येणे.(vakprachar in marathi)

अन्नास लावणे: उपजीविकेचे साधन मिळवून देणे.

आकांडतांडव करणे: रागाने आदळआपट करणे.

आपल्या पोळीवर तूप ओढणे: स्वतःचा फायदा करून घेणे.

(vakprachar in marathi)

आभाळ कोसळणे: एकाएकी फार मोठे संकट येणे.

आगीत तेल ओतणे: भांडण किंवा वाद विकोपाला जाईल असे करणे.

आकाश पाताळ एक करणे: फार मोठ्याने आरडाओरड करून थैमान घालने.

आंदण देणे: देऊन टाकणे.

आंबून जाणे: भेटून जाणे थकणे विपर्यास होणे.

आखाडे बांधणे: मनात आराखडा किंवा अंदाज करणे.

आतल्या आत कुढणे: मनातल्या मनात दुःख करणे.

आत्मसात करणे: मिळवणे अंगी बाणवणे.

आभाळाला कवेत घेणे: मोठे काम साध्य करणे.

आयोजित करणे: सिद्धता करणे प्रभावित होणे.

आवर्जून पाहणे: मुद्दामहून पाहण

इतिश्री करणे: शेवट करणे.

उधळून टाकणे : विखरून टाकणे.

वाक्य : खोडकर वासराने धान्याची रास उधळून लावली. (vakprachar in marathi)

उघड्यावर टाकणे : निराधार करणे, जबाबदारी झटकणे.

वाक्य : कर्मचाऱ्यांनी संप करून, शासकीय काम उघड्यावर टाकले.

उजळ माथ्याने फिरणे : उघडपणे वावरणे.

वाक्य : अनेक गुंड जामिनावर सुटून येऊन उजळ माथ्याने फिरतात.

उत्तेजन देणे : प्रोत्साहन देणे.

वाक्य : अभिजीतला मन लावून अभ्यास करण्यासाठी गुरुजींनी भरपूर प्रोत्साहन दिले

उखाळ्या-पाखाळ्या काढणे: एकमेकांची उणीदुणी काढणे किंवा दोष देणे.

(vakprachar in marathi)

उच्छाद मांडला: धिंगाना घालने.

उताणा पडणे: पराभूत होणे.

उताणे पडणे: पराभूत होणे.

उत्पात करणे: विध्वंस करणे.

उदास होणे: खिन्न होणे.

उपोषण करणे: लंघन करणे उपाशी राहणे.

उसंत मिळणे: वेळ मिळणे.

उसने बळ आणणे: खोटी शक्ती दाखविणे.

उसने बळ आनने: खोटी शक्ती दाखविणे.

Vakprachar In Marathi - मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग 1000+
उपकार फेडणे

उपकार फेडणे : उतराई होणे, कृतज्ञता दाखवणे.

वाक्य : ज्यांनी आपणांस मदत केली, आपण त्यांचे उपकार फेडावेत.

उन्हाची लाही फुटणे: अतिशय कडक ऊन पडणे.

(vakprachar in marathi)

उदास होने: खिन्न होणे.

उचलबांगडी करणे: एखाद्याला जबरदस्तीने हलवणे.

उखळ पांढरे होणे: पुष्कळ फायदा होणे.

उराशी बाळगणे: मनात जतन करुन ठेवणे.

उलटी अंबारी हाती येणे: भीक मागण्याची पाळी येणे.

उंटावरून शेळ्या हाकणे: मनापासून काम न करणे दूरवरून निर्देश देणे स्वतः सामील न होता सल्ले देणे.

उध्वस्त होणे: नाश पावणे.

उंबराचे फूल: क्वचित भेटणारी व्यक्ती.

उन्मळून पडणे: मुळासकट कोसळणे.

उदक सोडले: एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडून देणे.

उत्कट प्रेम असणे : खूप गाढ प्रेम असणे.

वाक्य : माझे माझ्या भारत देशावर उत्कट प्रेम आहे.

उरी फुटून मरणे : अतिश्रमाने मरण येणे.

वाक्य : पावसाअभावी अन्न पिकवण्यासाठी शेतकरी उरी फुटून मरत आहेत.

उदरनिर्वाह करणे : पोट भरणे, उपजीविका करणे.

वाक्य : दिवसभर शेतावर काम करून शेतकरी आपला उदरनिर्वाह करतात.

उड्डाण करणे : झेप घेणे.

वाक्य : परदेशी उच्चशिक्षणानिमित्त जाण्याऱ्या विपूलच्या विमानाने अखेर उड्डाण घेतले.

(vakprachar in marathi)

उंबरठा ओलांडणे : मर्यादा सोडणे.

वाक्य : आईला वाटेल तसे बोलून कौशलने उंबरठा ओलांडला.

उंडारने : बागडणे, हुंदडणे.

वाक्य : अभ्यास सोडून गावभर उंडारने बरोबर नाही, हे आई रमेशला समजावून सांगत होती.

उगम होणे : सुरुवात होणे.

वाक्य : त्र्यंबकेश्वरला गोदावरी नदीचा उगम होतो.

उष्टे हाताने कावळा न हाकणे: कधी कोणाला यत्किंचितही मदत न करणे.

उन्माद होणे : गुर्मी चढणे.

वाक्य : लॉटरीत 50 लाखांचे बक्षीस मिळताच पंकजच्या वागण्यात उन्माद आला.

ऊहापोह करणे: सर्व बाजूंनी चर्चा करून साधकबाधक विचार करणे.

ओक्साबोक्शी रडणे: मोठ्याने आवाज करत रडणे.

ओढा असणे: कल असणे.

(vakprachar in marathi)

एक घाव दोन तुकडे करणे: ताबडतोब निर्णय घेऊन गोष्ट निकालात काढणे.

Marathi Vakprachar

Vakprachar In Marathi
vakprachar in marathi

कानाडोळा करणे

कानाडोळा करणे : लक्ष न देणे.

वाक्य : आईकडे मी बहिणीची तक्रार करत होतो, पण आईने माझ्याकडे कानाडोळा केला.

कंपित होणे: कापणे थरथरणे.

कानउघडणी करणे : चुकीची जाणीव कडक शब्दात करून देणे.

वाक्य : रोज गृहपाट न करण्याच्या संदीपच्या वाईट सवयीमुळे सरांनी त्याची चांगलीच कानउघडणी केली.

कणव येणे : दया येणे.

वाक्य : रस्त्यावर पावसात भिजणाऱ्या कुत्र्याच्या पिल्लाला पाहून राकेशला त्याच्यावर कणव आली.

कच्छपी लागणे : एखाद्याच्या नादी लागणे.

वाक्य : मूर्ख माणसाच्या कधीच कच्छपी लागू नये.

कळीचा नारद : भांडणे लावणारा.

वाक्य : दोन अति घनिष्ट मित्रांमध्ये भांडण लावणाऱ्या हितेशला, कळीचा नारद म्हणणे चुकीचे नव्हे.

कपाळाला आठ्या पडणे : नाराजी दिसणे.

वाक्य : प्रणालीचे प्रगतीपत्र पाहून तिच्या वडिलांच्या कपाळावर आठ्या पडल्या.

कळस होणे : चांगल्या किंवा वाईट गोष्टीचा अतिरेक होणे.

वाक्य : कोणत्याही गोष्टीचा कळस होणे, हे चांगले नव्हे.

कालवा करणे : गोंधळ करणे.

वाक्य : लग्नात गौरीचा सोन्याचा हार चोरी झाल्याचे कळताच तिने कालवा सुरु केला.

कवडीही हातास न लागणे : एका पैशाचीही प्राप्ती न होणे.

वाक्य : कोरोना महामारीमुळे, धंदा बंद असल्या कारणाने गोपूला कवडीही हातास नाही लागली.

vakprachar in marathi

कंबर कसणे (कंबर बांधणे) : हिंमत दाखविणे, तयार होणे.

वाक्य : नोकरी सोडून नवीन उद्योग सुरु करण्यासाठी अमितने कंबर कसली.

कौतुक करणे : तारीफ करणे.

वाक्य : परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे सर्वजण अक्षयचे कौतुक करत आहेत.

कोप-यापासून हात जोडणे : संबंध न यावा अशी इच्छा करणे.

वाक्य : शशांकचे शेजारच्या अमितशी भांडण झाल्यामुळे, त्याने त्याचे कोपऱ्यापासून हात जोडले.

कान देणे : लक्षपूर्वक ऐकणे

वाक्य : आजोबांनी सांगितलेली गोष्ट मुलांनी कान देऊन ऐकली.

vakprachar in marathi

कणीक तिंबणे : मार देणे.

वाक्य : पोलिसांनी एका गुन्हेगाराची कणीक तिंबून गुन्ह्याची कबुली करून घेतली.

काळ पालटणे : रूप पालटणे.

वाक्य : परिस्तिथी बदलली की आपली जवळची माणसे सुद्धा काळ पलटतात.

कंठ दाटून येणे : गहिवरून येणे, दुःखाचा आवेग येणे.

वाक्य : स्वर्गवासी झालेल्या बाबांची आठवण येताच आकृतीचा कंठ दाटून आला.

कानउघाडणी करणे: क** शब्दात चूक दाखवून देणे.

काट्याचा नायटा होणे: शुल्लक गोष्टीचा भयंकर परिणाम होणे.

कावरा बावरा होणे: बाबरने.

.(vakprachar in marathi)

कंठशोष करण: ओरडून गळा सुकवणे उगाच घसाफोड करून खूप समजावून सांगणे.

कोंबडे झुंजवणे: दुसऱ्यांचे भांडण लावून आपण मजा पाहणे.

कागदी घोडे नाचवणे: लेखनात शूरपणा दाखविणे.

कपाळमोक्ष होणे: मरण पावणे.

काळजाचे पाणी पाणी होणे: अति दुःखाने मन विदारण होणे.

कायापालट होणे: स्वरूप पूर्णपणे बदलणे.

कानावर हात ठेवणे: माहीत नसल्याचा बहाणा करणे.

कानाडोळा करणे: दुर्लक्ष करणे.

कुंपणानेच शेत खाणे: ज्यांच्यावर जबाबदारी आहे अशा विश्वासातील माणसाने फफसवणे.

कंठस्नान घालने: ठार मारणे.

कंबर कसणे: एखाद्या गोष्टीसाठी हिम्मत करून तयार होणे.

vakprachar in marathi

काका वर करणे; आपल्याजवळ काही नाही असे दाखवणे.

काण फुंकणे: दुसऱ्याच्या मनात किल्मिष निर्माण करणे.

कपाळ फुटणे: दुर्दैव ओढवणे.

कुत्रा हाल न खाणे: अतिशय वाईट स्थिती येणे.

कणिक तिंबणे: खूप मार देणे.

काट्याने काटा काढणे: का शत्रूच्या सहाय्याने दुसर्या शत्रूचा पराभव करणे.

केसाने गळा कापणे: वरकरणी प्रेम दाखवून कप्तान एखाद्याचा घात करणे.

(vakprachar in marathi)

कंपित होणे: कापणे थरथरणे.

कच्छपी लागणे: नादी लागणे.

कट करणे: सख्य नसणे मैत्री नसणे.

कटाक्ष असणे: कल असणे.

कणव असणे: आस्था किंवा करून असणे.

कसं लावणे: सामर्थ्य पणाला लावणे.

कसून मेहनत करणे: खूप नेटाने कष्ट करणे.

कहर करणे : अतिरेक करणे.

कात्रीत सापडणे: दोन्ही बाजूंनी संकटात सापडले.

कानशिलं ची भाजी होणे: मारून मारून कानशिलांच्या आकार बदलणे.

कापरे सुटणे: घाबरल्यामुळे थरथरणे.

कारवाया करणे: कारस्थाने करणे.

काळीज उडणे: भीती वाटणे.

काळ्या दगडावरची रेघ: खोटे न ठरणारे शब्द.

किरकिर करणे: एखाद्या गोष्टीबाबत सतत तक्रार करणे.

कुणकुण लागणे: चाहूल लागणे.

कूच करने: वाटचाल करणे.

कोडकौतुक होणे: लाड होणे.

(vakprachar in marathi)

कासावीस होणे : व्याकूळ होणे.

वाक्य : उन्हात फिरून तहानेने मंगेशचा जीव कासावीस झाला.

खंत करणे : काळजी करणे, चिंता करणे.

वाक्य : बाहेरगावी शिकायला गेलेल्या चिन्मयची आई खंत करते.

खेटून उभे राहणे : जवळ बिलगून उभे राहणे.

वाक्य : लहानगी सारिका आपल्या आईला अगदी खेटून उभी होती.

Vakprachar In Marathi
खंत न करणे

(vakprachar in marathi)

खंत न करणे : काळजी न करणे.

वाक्य : खूप संकटे वाटयाला आली, तरी अमितरावांनी कधी खंत बाळगली नाही.

खंड न पडणे: एखादे कार्य करताना मध्ये न थांबणे.

खळखळ करणे: नाखुशीने सतत नकार देणे, टाळाटाळ करणे.

खायचे वांदे होणे: उपासमार होणे खायला न मिळणे.

खितपत पडणे: क्षीण होत जाणे.

vakprachar in marathi

खडानखडा माहिती असणे : बारीकसारीक माहिती असणे.

वाक्य : आमच्या मुख्याध्यापकांना शाळेच्या कामाची खडानखडा माहिती आहे.

खडकातून पाणी काढणे : अशक्य गोष्ट साध्य करणे.

वाक्य : नापीक जमिनीतून चांगले पीक काढून माधवने जणू खडकातून पाणी काढले.

खोडा घालणे : संकट निर्माण करणे, विघ्न आणणे.

वाक्य : गावात येणाऱ्या चांगल्या प्रकल्पाला काही माणसांनी खोडा घातला.

Vakprachar In Marathi
खुसपट निघणे

खुसपट निघणे : काहीतरी दोष निघणे.

वाक्य : विकासने कोणताही व्यवसाय सुरु केला, तरी त्यात काही ना काही खुसपट निघतच होती.

खांदे पडणे : निराश होणे, दीनवाणे होणे.

वाक्य : अपेक्षित गुण न मिळाल्यामुळे दिव्याचे खांदे पडले

खूणगाठ बांधणे : निश्चय करणे.

वाक्य : न चुकता, रोज कसरत करण्याची निखिलने मनाशी खूणगाठ बांधली.

खनपटीला बसने : पिच्छा पुरवणे.

वाक्य : आईने दिलेला अभ्यास पूर्ण करण्याचे दीपाच्या खनपटीला बसवले.

खिळून राहणे : जागच्या जागी स्थिर होणे.

वाक्य : समोर साप पाहताच विनोद खिळून राहिला.

खोडी उलटणे : आपण केलेली खोडी अंगाशी येणे.

वाक्य : ऋषी धीरजची मस्करी करायला गेला, पण त्याची त्याच्यावरच खोडी उलटली.

खसखस पिकणे : मोठयाने हसणे.

वाक्य : सरांनी चुटकुला सांगताच सर्व विद्यार्थ्यांमध्ये खसखस पिकली.

खळखळ करणे : नाखुशीने सतत नकार देणे, टाळाटाळ करणे.

वाक्य : ताटात कारल्याची भाजी वाढली की, रेणू आईपाशी खळखळ करते.

खडे फोडणे : दोष देणे.

वाक्य : सचिनकडून अंगठी हरवल्यामुळे सर्वजण त्याच्यावर खडी फोडत आहेत.

खोऱ्याने पैसा ओढणे : खूप पैसा मिळवणे.

वाक्य : दिवसरात्र अभ्यास करून डॉक्टर झालेला प्रणव आज खोऱ्याने पैसा ओढत आहे.

खुशीत मान डोलवणे : आनंदाने होकार देणे.

वाक्य : खेळणे हवे का, असे विचारताच छोटयाश्या विहानने खुशीत मान डोलावली.

vakprachar in marathi

खाली मान घालणे : शरम वाटणे.

वाक्य : चूक समजल्यामुळे अनुने खाली मान घातली.

खपणे : कष्ट करणे.

वाक्य : चांगले पीक पिकण्यासाठी शेतकरी दिवसभर शेतात खपतात.

खेद वाटणे : वाईट वाटणे.

वाक्य -आईला वाईट बोलल्याबद्दल, जीवनला खेद वाटला.

खंड न पडणे : एखादे कार्य करताना मध्ये न थांबणे.

वाक्य : नित्यनियमाने देवपूजा करण्यात आईचा कधीही खंड पडला नाही.

ख्याती मिळवणे : प्रसिद्ध होणे, नाम कमावणे.

वाक्य : मदर तेरेसा यांनी गरिबांची सेवा करून ख्याती मिळवली.

खल करणे : चर्चा करणे.

वाक्य : पाण्याच्या अपुऱ्या पुरवठ्याबद्दल महानगरपालिकेतील सदस्य गंभीर खल करत आहेत.

(vakprachar in marathi)

खुशामत करणे : स्तुती करणे.

वाक्य : मित्रांसोबत सहलीस जाण्याची परवानगी मिळावी, म्हणून सचिनने वडिलांची खुशामत करत होता.

खसखस पिकणे: मोठ्याने हसणे.

खापर फोडणे: एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे

खडे फोडणे: दोष देणे.

खो घालने: विघ्न निर्माण करणे.

खूणगाठ बांधणे: निश्चय करणे.

vakprachar in marathi

खाल्ल्याघरचे वासे मोजणे: उपकार करणार याचे वाईट चिंतेने.

खाजवुन खरुज काढणे: मुद्दाम भांडण करू उकरून काढणे.

खडा टाकून पहाणे: अंदाज घेणे.

खडे चारणे: शरण येण्यास भाग पाडणे.

मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग 100 (vakprachar in marathi)

गर्भगळीत होणे अतिशय घाबरणे.

गळ्यात पडणे: एखाद्याला खूपच भीड घालने

गळ्यातील ताईत: अतिशय प्रिय.

गुण दाखवणे: निर्गुण दाखवून दुर्गुण दाखवणे.

गुजराण करणे: निर्वाह करणे.

गाशा गुंडाळणे: एकाएकी निघून जाणे एकदम पसार होणे.

गळ घालने: अतिशय आग्रह करणे.

गळ्यात धोंड पडणे:तिचं असताना जबाबदारी अंगावर पडणे.

vakprachar in marathi

गाडी पुन्हा रुळावर येणे: चुकीच्या मार्गावरून पुन्हा पूर्ववत मार्ग योग्य मार्गाला येणे.

गंगेत घोडे न्हाने: कार्य तडीस गेल्यावर समाधान वाटणे.

vakprachar in marathi

गळ्याशी येणे: नुकसानीबाबत अतिरेक होणे.

गट्टी जमणे: दोस्ती होणे.

गढून जाणे: मग्न होणे गुंग होणे.

गाजावाजा करणे: खूप प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करणे.

गाजावाजा करने: प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करणे.

गुण्यागोविंदाने लहाने: प्रेमाने एकत्र रहाणे.

गुमान काम करणे: निमूटपणे काम करणे.

ग्राह्य धरणे योग्य आहे: असे समजणे.

घोकंपट्टी करणे: अर्थ लक्षात न घेता केवळ पाठांतर करणे.

चक्कर मारणे: फेरफटका मारणे.

चाहूल लागणे: एखाद्याचे अस्तित्व जाणवणे.

चाहूल लागणे: मागोवा लागणे.

चिंता वाहने: आस्था असणे.

चितपट करणे: कुस्ती हरविणे.

चित्त विचलित होणे: मूळ विषयाकडे लक्ष दुसरीकडे जाणे.

चेहरा खोलने: आनंद होणे.

छातीत धस्स देशी गोळा येणे: अचानक खूप घाबरणे.

छाननी करणे: तपास करणे.

छाप पडणे: परिसीमा गाठणे.

जम बसने: स्थिर होणे.

जळफळाट होणे: रागाने लाल होणे.

जीव वरखाली होणे: घाबरणे.

जीवाची मुंबई करणे: अतिशय चैनबाजी करणे.

ज्याचे नाव ते असणे: उपमा देण्यात उदाहरण नसणे.

100 Vakprachar In Marathi With Meaning

घर धुवून नेणे: सर्वस्वी लुबाडणे.

vakprachar in marathi

घोडे पेंड खाणे: अडचण निर्माण होणे.

घोडे पुढे धामटणे: स्वतःच्या फायद्यासाठी पुढे सरसावणे.

घडी भरणे: विनाश काळ जवळ येऊन ठेपणे.

घर डोक्यावर घेणे: अतिशय गोंगाट करणे.

घोडे मारणे: नुकसान करणे.

घाम गाळणे: खूप कष्ट करणे.

vakprachar in marathi

घालून-पाडून बोलणे: दुसऱ्याच्या मनाला लागेल असे बोलणे.

चतुर्भुज होणे: लग्न करणे.

चारी दिशा मोकळ्या होणे: पूर्ण स्वातंत्र्य मिळणे.

जीवाला घोर लागणे: खूप काळजी वाटणे.

जीव टांगणीला लागणे: चिंताग्रस्त होणे.

जमीनदोस्त होणे: पूर्णपणे नष्ट होणे.

जिवाचे रान करणे: खूप कष्ट सोसणे.

जीव गहाण ठेवणे: कोणत्याही त्यागास तयार असणे.

जंग जंग पछाडणे: निरनिराळ्या रीतींनी प्रयत्न करणे कमालीचा प्रयत्न करणे.

जीवावर उदार होणे: प्राण देण्यास तयार होणे.

जिव थोडा थोडा होणे: अतिशय काळजी वाटणे.

vakprachar in marathi

जीव की प्राण असणे: प्राणाइतके प्रिय असणे.

जीव मुट्टीत धरणे: मन घट्ट करणे.

जिभेला हाड नसणे: वाटेल ते बेजबाबदार पणे बोलणे.

जीव अधीर होणे: उतावीळ होणे.

जीव खाली पडणे: काळजी मुक्त होणे.

जिवात जिव येणे: काळजी नाहीशी होऊन पुन्हा धैर्य येणे.

जिवावर उठणे: जीव घेण्यास उद्युक्त होणे.

जीव भांड्यात पडणे: काळजी दूर होणे.

जीव मेटाकुटीस येणे: त्रासाने अगदी कंटाळून झाली.

जोपासना करणे: काळजीपूर्वक संगोपन करणे.

जीवावर उड्या मारणे: दुसऱ्यावर अवलंबून राहून चैन करणे.

खालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा

झळ लागणे: थोडाफार दुष्परिणाम भोगावा लागणे.

झुंज देणे: लढा देणे संघर्ष करणे.

झाकले माणिक: साधा पण गुणी मनुष्य.

टक लावून पाहणे: एकसारखे रोखून पाहणे.

टाके ढीले होणे: अतोनात श्रम झाल्यामुळे अंगी ताकत न रहाणे.

टाहो फोडणे: मोठ्याने आकांत करणे.

टेंभा मिरविणे: दिमाख दाखवणे.

vakprachar in marathi

टिकाव लागणे: निभाव लागणे.

ठसा उमटवणे: छाप पाडणे.

ठाण मांडणे: एका जागेवर बसून राहणे.

डोळ्यात प्राण आणणे: एखाद्या गोष्टीसाठी अतिशय आतुर होणे.

डाळ शिजणे: थारामानी मिळणे आणि सोया जुळणे मनाजोगे काम होणे.

डोळे फाडून पहाणे: तीक्ष्ण नजरेने पाहणे आश्चर्यचकित होऊन पाहणे.

डोळे निवणे: समाधान होणे.

डांगोरा पिटणे: जाहीर वाच्यता करणे.

vakprachar in marathi

डोळ्यात तेल घालून रहाणे: अतिशय जागृत रहाणे.

डोळे दिपवले: थक्क करून सोडले.

डोळे भरून पहाणे: समाधान होईपर्यंत पाहाने.

डोळ्यांत खुपणे: सहन न होणे.

डोळ्यांवर कातडे ओढणे: जाणून बुजून दुर्लक्ष करणे.

डोके खाजविणे: एखाद्या गोष्टीचा विचार करणे.

डोक्यावर खापर फोडणे: एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे.

डोळा चुकवणे: अपराधी भावनेमुळे नजरेला नजर देणं टाळणे.

डोळ्यांचे पारणे फिटणे: पूर्ण समाधान होणे.

डोक्यावर मिरी वाटणे: वरचढ होणे.

डाव साधने: संधीचा फायदा घेऊन कार्य साधने योजलेल्या युक्तीने इष्ट वस्तू मिळविणे.

vakprachar in marathi

डोळे खिळून राहणे: एखाद्या गोष्टीकडे सारखे बघत राहणे.

डोळ्यात धूळ फेकणे: फसवणूक करणे.

डाव येणे: खेळात राज्य येणे.

डोक्यावर घेणे: अति लाड करणे.

डोळे फिरले: खूप घाबरणे.

डोळे लावून बसणे: खूप वाट पाहणे.

डोळे वटारणे: रागाने बघणे.

डोळ्याला डोळा न भिडवणे: घाबरून नजर न देणे.

वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा (vakprachar in marathi)

तोंड ढाकणे: बोलणे.

तिलांजली देणे: सोडणे त्याग करणे.

तोंडावाटे ब्र न काढणे: एकही शब्द न उच्चारणे.

तोंडात बोट घालने: आश्चर्यचकित होणे.

तळपायाची आग मस्तकात जाणे: अतिशय संताप होणे.

vakprachar in marathi

तडीस नेणे: पूर्ण करणे.

तोंड काळे करणे: दृष्टीआड होणे नाहीसे होणे.

तोंडचे पाणी पळणे: अतिशय घाबरले भयभयीत होणे.

ताळ्यावर आनने: योग्य समज देणे.

vakprachar in marathi

तारांबळ उडणे: अतिशय घाई होणे.

तोंडाला पाणी सुटणे: लालसा उत्पन्न होणे.

तळहातावर शीर घेणे: जीवावर उदार होणे.

तोंडाला पाने पुसणे: फसवणे.

तगादा लावणे: पुन्हा पुन्हा मागणी करणे.

तगून राहणे: मुखोद्गत असणे.

तजवीज करणे: तरतूद करणे.

ताटकळत उभे राहणे: वाट पाहणे.

तारांबळ होणे: घाईगडबड होणे.

तोंड देणे: मुकाबला करणे सामना करणे.

तोंड भरून बोलणे: खूप स्तुती करणे.

तोंडून अक्षरं न फुटणे: घाबरून न बोलणे.

Marathi Vakprachar List With Meaning (vakprachar in marathi)

थुंकी झेलणे: खुशामत करण्यासाठी लाचारी पत्करणे.

थांब न लागणे: कल्पना न येणे.

दक्षता घेणे: काळजी घेणे.

दडी मारणे: लपून राहणे.

दप्तरी दाखल होणे: संग्रही जमा होणे.

vakprachar in marathi

दातखिळी बसणे: बोलती बंद होणे.

दिशा फुटेल तिकडे पडणे: सैरावैरा पळणे.

दिस बुडून जाणे: सूर्य मावळणे.

देखभाल करणे: जतन करणे.

देखरेख करणे: राखण करणे.

देणे-घेणे नसणे: संबंध नसणे.

देहातून प्राण जाणे: मरण येणे.

दाद मागणे: तक्रार करून किंवा गार्हाणे सांगून न्याय मागणे.

दुःखावर डागण्या देणे: झालेल्या माणसाला वाईट वाटेल असे बोलून आणखी दुःख देणे, हट्ट धरून बसणे.

दोन हातांचे चार हात होणे: विवाह होणे.

दाढी धरणे: विनवणी करणे.

दात धरणे: वैर बाळगणे.

दगडावरची रेघ: खोटे न ठरणारे शब्द.

दत्त म्हणून उभे राहणे: एकाएकी हजर होणे.

दगा देणे: फसवणे.

दातांच्या कन्या करणे: अनेक वेळा विनंती करून सांगणे.

दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे: दुसऱ्याच्या तंत्राने किंवा सल्ल्याने चालणे.

दातखिळी बसणे: बोलणे अवघड होणे.

द्राविडी प्राणायाम करणे: सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे.

दात ओठ खाणे: द्वेषाची भावना दाखवणे.

दातास दात लावून बसणे: काही न खातो उपाशी राहणे.

दबा धरून बसणे: टपून बसणे.

दाती तृण धरणे: शरणागती पत्करणे.

Vakprachar Meaning

धाबे दणाणणे: खूप घाबरणे.

धारातीर्थी पडणे: रणांगणावर मृत्यू येणे.

धूम ठोकणे: वेगाने पळून जाणे.

धूळ चारणे: पूर्ण पराभव करणे

धडपड करणे: खूप कष्ट करणे.

धारवाडी काटा: बिनचूक वजनाचा काटा.

धिंडवडे निघणे: फजिती होणे.

धुडगूस घालने: गोंधळ घालून करणे.

नाक मुरडणे: नापसंती दाखवणे.

50 Vakprachar In  Marathi With Meaning And Sentence

नाकाशी सूत धरणे: आता मरतो की घटकेने मरतो अशी स्थिती निर्माण होणे.

नाकी नऊ येणे: मेटाकुटीला येणे फार त्रास होणे

नांगी टाकणे हातपाय गाळणे.

नाद घासणे: स्वतःची कार्य साधण्यासाठी दुसर्याचे पाय धरणे.

नाव मिळवणे: कीर्ती मिळवणे.

नजरेत भरणे: उठून दिसणे.

नाक ठेचणे: नक्शा उतरवणे.

नाकाला मिरच्या झोंबणे: एखाद्याचे वर्म काढल्यामुळे त्याला राग येणे.

नजर करणे: भेटवस्तू देणे.

नाकावर राग असणे:लवकर चिडणे.

नक्शा उतरवणे: गर्व उतरवणे.

नाकाने कांदे सोलणे: स्वतःचे दोष असूनही उगाच बढाया मारणे.

नजर वाकडी करणे: वाईट हेतू बाळगणे.

नसती बिलामत येणे: नसती कटकट ओढणे.

नाक मुठीत धरणे: अगतिक होणे.

नाळ तोडणे: संबंध तोडणे.

नाव कमावणे: कीर्ती मिळवणे.

निक्षून सांगणे: स्पष्टपणे सांगणे.

निद्राधीन होणे: झोपणे.

निष्प्रभ करणे: महत्व कमी करणे.

नूर पातळ होणे: रूप उतरणे.

Marathi Vakprachar With Meaning And Sentence

पादाक्रांत करणे: जिंकणे.

पोटात शिरणे: मर्जी संपादन करणे.

पदरात घेणे: स्वीकारणे.

पाणी मुरणे: कपटाने काहीतरी लपवून ठेवणे गुप्त कट शिजवत असणे.

पाणी पडणे: वाया जाणे.

पाठ दाखवणे: पळून जाणे.

पाऊल वाकडे पडणे: वाईट मार्गाने जाणे.

पोटात कावळे: काव काव करणे.

पुंडाई करणे: दांडगाईने वागणे.

पोटाला चिमटा घेणे: पोटाला न खाता राहणे.

पाणी पाजणे: पराभव करणे.

पाठ न सोडणे: एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवणे

पार पाडणे पूर्ण करणे.

पोटात घालने: क्षमा करणे.

पाण्यात पाहणे: अत्यंत द्वेष करणे

पाठीशी घालने: संरक्षण देणे.

पाणी सोडणे:आशा सोडणे.

पाचवीला पुजणे: त्रासदायक गोष्टींची कायमची सोबत असणे.

पायाखाली घालने: पादाक्रांत करणे.

पदरात घालने: सुख पटवून देणे स्वाधीन करणे.

पायमल्ली करणे: उपमर्द करणे.

पदरमोड करणे: दुसऱ्यासाठी स्वतःचा पैसा खर्च करणे.

पोटाची दमडी वळणे: खायला न मिळणे.

पोटावर पाय देणे: उदर निर्वाहाचे साधन काढून.

पाढा वाचणे: सविस्तर हकीकत सांगणे.

पडाव पडणे: वस्ती करणे.

पदरी घेणे: स्वीकार करणे.

पराकोटीला जाणे: काळ्यापाण्याची शिक्षा मरेपर्यंत कैद होणे.

परिपाठ असणे: विशिष्ट पद्धत असणे नित्यक्रम असणे.

पहारा देणे: राखण करणे.

पाचवीला पूजले: एखादी गोष्ट जन्मापासून असणे.

पाठिंबा देणे: दुजोरा देणे.

पार पाडणे: सांगता करणे.

पाळत ठेवणे: लक्ष ठेवणे.

पाळी येणे: वेळे येणे.

पिंक टाकणे: थुंकणे.

पुढाकार घेणे: नेतृत्व करणे.

पुनरुज्जीवन करणे: पुन्हा उपयोगात आणणे.

पोटात ठेवणे: गुप्तता ठेवणे.

प्रक्षेपित करणे: प्रक्षेपित करणे.

प्रघात पडणे: रीत असणे.

प्रचारात आणणे: जाहीरपणे माहिती देणे.

प्रतिकार करणे: विरोध करणे.

प्रतिबंध करणे: अटकाव करणे.

प्रतिष्ठान लाभणे: मान मिळवणे.

प्रतिष्ठापीत करणे: स्थापना करणे.

प्रत्यय येणे: प्रचीती येणे.

प्रस्ताव ठेवणे: ठराव मांडणे.

प्राणाला मुकले: जीव जाणे मरण येणे.

प्राप्त करणे: मिळवणे.

फंदात न पडणे: भानगडीत न अडकणे.

फटफटती सकाळ होणे: पोटात कावळे ओरडत भुकेने व्याकूळ होणे.

Marathi Vakprachar Vakyat Upyog

फिदा होणे: खुश होणे.

बडेजाव वाढवणे: प्रौढी मिरवणे.

बत्तर बाळ्या होणे: चिंध्या होणे नासधूस होणे.

बळ लावणे: शक्ती खर्च करणे.

बस्तान ठोकणे: मुक्काम ठोकणे.

बस्तान बसणे: पसंती मिळणे अनुकूलता लाभणे.

बस्ती घेणे: धक्का घेणे घाबरणे.

बहिष्कार टाकणे: वाळीत टाकणे नकार देणे.

बांधणी करणे: रचना करणे.

बाजार गप्पा: निंदानालस्ती.

बारा गावचे पाणी पिणे: विविध प्रकारचे अनुभव घेणे.

बाहू स्फुरण पावणे: स्फूर्ती येणे.

बेत आखणे: योजना आखणे.

बेत करणे: योजना आखणे.

ब्रह्म करणे: भटकंती करणे.

बोल लावणे: दोष देणे.

बोचणी लागणे: एखादी गोष्ट मनाला लागून राहते

बोटावर नाचवणे: आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे.

बोळ्याने दूध पिणे: बुद्धिहीन असणे.

बादरायण संबंध असणे: ओढून ताणून लावलेला संबंध असणे.

ब्रम्हा करणे: बोभाटा करणे सगळीकडे प्रसिद्ध करणे.

बुचकळ्यात पडणे: गोंधळून जाणे.

बारा वाजले: पूर्ण नाश होणे.

बत्तीशी रंगवणे: जोराने थोबाडीत मारणे.

बेत हाणून पाडणे: बेत सिद्धीला जाऊ न देणे.

Marathi Vakprachar With Meaning

भान नसणे: जाणीव नसणे.

भारून टाकणे: पूर्णपणे मोहून टाकणे.

भगीरथ प्रयत्न करणे: चिकाटीने प्रयत्न करणे.

भंडावून सोडले: त्रास देणे.

भडभडून येणे: हुंदके देणे गलबलले.

भर असणे: जोर असणे.

भरभराट होणे: प्रगती होणे समृद्धी होणे.

भाऊबंदकी असणे: ना त्यांना त्यात भांडण असणे.

भान ठेवणे: जाणीव ठेवणे.

भानावर येणे: परिस्थितीची जाणीव होणे शुद्धीवर येणे.

Marathi Vakprachar List

मशागत करणे: मेहनत करून निगा राखणे

मधून विस्तव न जाणे: अतिशय वैर असणे.

मूग गिळणे: उत्तर न देता गप्प राहणे.

मनाने घेणे: मनात पक्का विचार येणे.

मन मोकळे करणे: सुखदुःखाच्या गोष्टी बोलून दाखविणे.

माशा मारणे: कोणताही उद्योग न करणे.

मधाचे बोट लावणे: आशा दाखवणे.

मिशीवर ताव मारणे: बढाई मारणे.

मनात घर करणे: मनात कायमचे राहणे.

मनावर ठसण: मनावर जोरदारपणे बिंबणे.

मात्रा चालणे: योग्य परिणाम होणे.

मनात मांडे खाणे: व्यर्थ मनोराज्य करणे.

मन सांशक होणे: मनात संशय वाटू लागणे.

मती गुंग होणे: आश्चर्य वाटणे.

मत्सर वाटणे: काळजी घेणे.

मनावर बिंबवणे: मनावर ठसवणे.

मनोरथ पूर्ण होणे: इच्छा पूर्ण होणे.

मराठी भरारी मारणे: झेप घेणे.

मात करणे: विजय मिळवणे.

मान्यता पावणे: सिद्ध होणे.

माशी शिंकणे: अडथळा येणे.

मिनतवारी करणे: दादा पुता करणे.

मिशांना तूप लावणे: उगीच ऐट दाखवणे.

मोहाला बळी पडणे: एखाद्या गोष्टीच्या आसक्ती मध्ये वाहून जाणे.

यक्षप्रश्न असणे: महत्त्वाची गोष्ट असणे.

रक्षणाची काळजी घेणे: योगक्षेम चालविणे.

रवाना होणे: निघून जाणे.

रस असणे: अत्यंत आवड असणे.

राबता असणे: सतत ये-जा असणे.

रियाज करणे: सराव करणे.

रुची निर्माण होणे: गोडी निर्माण होणे.

रोज ठेवणे चिडणे: नाराजी असणे.

ललकारी देणे: जयघोष करणे.

लळा लागणे: ओढ वाटणे.

लवलेश नसणे: जराही पत्ता नसणे.

लष्टक लावणे: झंझट लावणे निकड लावणे.

लष्कराच्या भाकर्या भाजणे: दुसऱ्यांच्या उठाठेवी करणे.

लौकिक मिळवणे: सर्वत्र मान मिळवणे.

लक्ष्मीचा वरदहस्त असणे: लक्ष्मीची कृपा असणे श्रीमंती असणे.

विडा उचलणे: निश्चय किंवा प्रतिज्ञा करणे.

वाट तुडवणे: रस्ता कापणे.

वाचा बसणे: एक शब्द येईल बोलता न येणे.

विसंवाद असणे: एकमेकांशी न जमणे.

विचलित होणे: मनाची चलबिचल होणे.

वेड घेऊन पेडगावला जाणे: मुद्दाम ढोंग करणे.

वठणीवर आणणे: ताळ्यावर आणणे.

वड्याचे तेल वांग्यावर काढणे: एकाचा राग दुस-यावर काढणे.

वाटाण्याच्या अक्षता लावणे: स्पष्टपणे नाकारले.

वणवण भटकणे: एखादी गोष्ट मिळविण्यासाठी खूप फिरणे.

वकील पत्र घेणे: एखाद्याची बाजू घेणे.

वाट लावणे: विल्हेवाट लावणे मोडून तोडून टाकणे.

वंचित रहाणे: एखादी गोष्ट न मिळणे.

वजन पडणे: प्रभाव पडणे.

वनवन करणे: खूप भटकणे.

वरदान देणे: कृपाशीर्वाद देणे.

वाचा बंद होणे: तोंडातून एक शब्दही बाहेर न पडणे.

वारसा देणे: वडिलोपार्जित हक्क सोपवणे.

वाऱ्यावर सोडणे: अनाथ करणे.

विदीर्ण होणे: भग्न होणे मोडतोड होणे.

विरस होणे निराशा होणे: उत्साहभंग होणे.

विरोध दर्शवणे: प्रतिकार करणे.

विसावा घेणे: विश्रांती घेणे.

वेसन घालने: मर्यादा घालने.

व्रत घेणे: वसा घेणे.

शहानिशा करणे: एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करून घेणे.

शब्द जमिनीवर पडू न देणे: दुसऱ्याच्या इच्छेनुसार लगेच कार्यवाही करणे.

शंभर वर्ष भरणे: नाश होण्याची वेळी घेणे.

शिगेला पोचणे: शेवटच्या टोकाला जाणे.

Marathi Vakprachar Arth

स्वप्न भंगणे: मनातील विचार कृतीत न येणे.

संधान बांधने: जवळीक निर्माण करणे.

सामोरे जाणे: निधड्या छातीने संकटास तोंड देणे.

स्वर्ग दोन बोटे उरणे: आनंदाने गर्वाने अतिशय फुगून जाणे.

साखर पेरणे: गोड गोड बोलून आपलेसे करणे.

सोन्याचे दिवस येणे: अतिशय चांगले दिवस येणे.

संभ्रमात पडणे: गोंधळात पाडणे.

सर्वस्व पणाला लावणे: सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे.

सुताने स्वर्गाला जाण: थोडा सुगावा लागताच संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जाणण्याचा प्रयत्न करणे.

साक्षात्कार होणे: आत्मिक ज्ञान प्राप्त होणे खरेखुरे स्वरूप कळणे.

साक्षर होणे: लिहिता-वाचता येणे.

सूतोवाच करणे: पुढे घडणाऱ्या गोष्टींची प्रस्तावना करणे.

संपवणे: संपन्न होणे.

संभ्रमित होणे: गोंधळणे.

सख्या नसणे: प्रेमळ नाते नसणे.

सपाटा लावणे: एक सारखे वेगात काम करणे.

समजूत काढणे: समजावणे हेवा वाटणे.

समरस होणे: गुंग होणे.

सहभागी होणे: सामील होणे.

सही ठोकणे: निश्चित करणे.

सांजावने: संध्याकाळ होणे.

साद घालने: मनातल्या मनात दुःख करणे.

सारसरंजाम असणे: सर्व साहित्य उपलब्ध असणे.

साशंक होणे: शंका येणे.

सूड घेणे: बदला घेणे.

स्तंभित होणे: आश्चर्याने स्तब्ध होणे.

Marathi Vakprachar

हाताला हात लावणे: थोडीदेखील मेहनत न घेता फुकटचे श्रेय घेणे.

हमरीतुमरीवर येणे: जोराने भांडू लागणे.

हातपाय गळणे: धीर सुटणे.

हात धुवून पाठीस लागणे: चिकाटीने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे.

हातचा मळ असणे: सहजशक्य असणे.

हात न पसरणे: भीक न मागणे

हातात कंकण बांधणे: प्रतिज्ञा करणे.

हट्टाला पेटणे: मुळीच हट्ट न सोडणे.

हातावर शीर घेणे:जिवावर उदार होऊन किंवा प्राणांचीही पर्वा न करणे.

हाय खाणे: धास्ती घेणे.

हात टेकणे: नाइलाज झाल्याने माघार घेणे.

हरभऱ्याच्या झाडावर चढणे: खोटी स्तुती करून मोठेपणा देणे.

हात देणे: मदत करणे.

हात चोळणे: चरफडणे.

हसता हसता पुरेवाट होणे: अनावर हसू येणे.

हात ओला होणे: फायदा होणे.

हस्तगत करणे: ताब्यात घेणे.

हात हलवत परत येणे: काम न होता परत येणे.

हात झाडून मोकळे होणे: जबाबदारी अंगावर टाकले की व जबाबदारी टाकून टाकून मोकळे होणे.

हातावर तुरी देणे: डोळ्यांदेखत फसवून निसटून जाणे.

हात मारणे: ताव मारणे भरपूर खाणे.

हाडीमांसी भिनने: अंगात मुरणे

हंबरडा फोडणे: मोठ्याने रडणे.

हवालदील होणे: हताश होणे.

हशा पिकणे: हास्य स्फोट होणे.

हसता हसता पोट दुखणे: खूप हसणे.

हाऊस मागवणे: आवड पुरवून घेणे.

हातभार लावणे: सहकार्य करणे.

हीच काय दाखविणे: बळ दाखवून किंमत लक्षात आणून देणे.

हुडहुडी भरणे: थंडी भरणे.

निष्कर्ष

मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग 100 Vakprachar In Marathi या पोस्ट मध्ये तुम्हाला मला माहीत असलेले Vakya prachar मी दिले आहे जर तुम्हाला माहित असलेले मराठी वाक्यप्रचार या पोस्ट मध्ये नसेल तर मला कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करून नक्की कळवा मी ते या पोस्ट ऍड करीन.

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 3.5 / 5. Vote count: 10

No votes so far! Be the first to rate this post.

3 thoughts on “1001+ Vakprachar In Marathi | मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग 100”

  1. खूप छान वाक्प्रचार. मुलांसाठी उत्तम .
    मुलांसाठी वापरावे .

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!