Viram Chinh In Marathi: नमस्कार मंडळी या पोस्ट मध्ये मराठी व्याकरणाचे महत्वाचे घटक Viram Chinh बद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. जे मूल शाळेत आहेत व पोलीस भरती स्पर्धा परीक्षा जसे Mpsc, PSI, STI, ASO, ZP, Talathi Bharti ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विराम चिन्हे काय आहेत? विराम चिन्हे कसे लिहतात? हे माहीत असणे गरजेचे आहे.
कारण परीक्षेच्या दृष्टीने मराठी व्याकरण हे खूप महत्वाचे आहे. परीक्षेत वाक्य शुद्ध करा, वाक्य पूर्ण करा, विरामचिन्हांचा वापर करा यासारखे प्रश्न नेहमी विचारले जातात.
मी या पोस्ट मध्ये Viram Chinh बद्दल मला माहिती आहे आणि पुस्तकामध्ये दिले आहे ती मी या पोस्ट मध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि वेळोवेळी या मध्ये मी बद्दल ही करत जाईन.
Table of Contents
विराम चिन्हे (Viram Chinh In Marathi)

पहिले मराठी ही मोडी लिपी मध्ये लिहिली जायची मोडी लिपीत विराम चन्हे न्हवती आणि संस्कृत मध्ये दंड सोडून दुसरे चिन्ह न्हवते.
नंतर जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले तेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यातील अधिकारी, शिक्षक आणि कोषकार थॉमस कॅंडी यांनी मराठी ही देवनागरी लिपीत लिहायला सुरुवात केली.
- Also Read: Vakprachar In Marathi
- Also Read: Samanarthi Shabd In Marathi
आणि मराठी भाषेत Viram Chinh पहिल्यांदा वापरले. पुन्हा कालांतराने मराठी भाषेत विराम चन्हे वापरण्याची सुरुवात झाली.
विरामचिन्हे म्हणजे काय ?
मित्रानो विरामचिन्हे म्हणजे आपण जेव्हा एखाद्या व्यक्ती ला बोलतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला ते अचूक पणे कळते. पण आपण जेव्हा लिहतो तेंव्हा वाचणाऱ्या व्यक्तीला कसे कळणार? की कुठे थांबायचे आहे? किती वेळ थांबायचे आहे? आणि कुठल्या शब्दावर जोर द्यायचा आहे. हे त्या व्यक्तीला कळावे या साठी Viram Chinh यांचा वापर होतो.
विरामचिन्हे व्याख्या (Definition of Viram Chinh in Marathi)
आपण जेव्हा लिहतो तेंव्हा वाचणाऱ्या व्यक्तीला कळावे की कुठे थांबायचे आहे? किती वेळ थांबायचे आहे? आणि कुठल्या शब्दावर जोर द्यायचा आहे कळावे या साठी विरामचिन्हे वापरतात.
- Also Read: Patra Lekhan In Marathi
विरामचिन्हे व त्यांचे प्रकार (Types of Viram Chinh in Marathi)
विरामचिन्हे व त्याचे प्रकार | |
---|---|
प्रकार | चिन्ह |
पूर्णविराम | . |
स्वल्प विराम | , |
अर्धविराम | ; |
अपूर्णविराम | : |
प्रश्नचिन्ह | ? |
उद्गारवाचक चिन्ह | ! |
एकेरी अवतरणचिन्ह | ‘ ’ |
दुहेरी अवतरण चिन्ह | ” “ |
संयोगचिन्ह | (-) |
अपसरण चिन्ह | (-) |
विरामचिन्ह आणि त्यांची माहिती (Viram Chinh Information in Marathi)
मित्रानो येथे तुम्हाला प्रत्येक विरामचिन्ह कुठे? व का? वापरायचे हे सांगणार आहे. आणि सोबत काही उदाहरणे ही देणार आहे जनेकरून तुम्हाला लवकर समजावे.
पूर्णविराम ( . ) (Full Stop)
जसे की नावातच ‘पूर्ण विराम’ आहे पूर्णविराम जेंव्हा आपण कोणतेही वाक्य लिहतो ते वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी पूर्णविराम (.) चा वापर करतो.
उदाहरण :
- मी राम भक्त आहे.
- माझे नाव अभिषेक आहे.
- मी मराठी बोलतो.
- मी दररोज शाळेत जातो.
- मी लातूर मध्ये राहतो.

वरी दिलेल्या उदाहरणात ‘मी राम भक्त आहे.‘ ↙️ च्या शेवटी पूर्णविराम दिला आहे म्हणजेच हे वाक्य पूर्ण झाले आहे. आणि हे वाक्य वाचणाऱ्या व्यक्तीला समजते की कुठे विराम घ्यायचा आहे. आणि या वाक्याच्या पुढे कोणतेही वाक्य असेल तर तो व्यक्ती जिथे पूर्णविराम आहे तेथे थांबुन पुढचे वाक्य वाचेल.
पुर्णविराम चिन्ह संक्षिप्त रूपात शेवटीही वापरतात.
उदाहरण :
- छ.शिवाजी महाराज
- वि.दा. सावरकर
पूर्ण वाक्य : (छत्रपती शिवाजी महाराज, वीर विनायक दामोदर सावरकर).
स्वल्पविराम ( , )
जेव्हा आपल्याला वाक्यातील शब्द, विभाग किंवा वाक्याचा अंश यांचा वेगळेपणा दाखवायचे असते तेंव्हा स्वल्पविराम ( , ) चा वापर होतो. वाक्यात शेवटच्या दोन शब्दांत आणि/व या दोन शब्दांचा वापर होतो.
आपण जेंव्हा एखाद्या व्यक्ती ला हाक मारल्यानंतर नाव व संबोधन करताना ही स्वल्पविराम चा वापर होतो
उदाहरण :
- बाजारातून मेथी, टमाटे, कांदे आणि लसूण आन.
- मित्रानो, आज येथे आपण जमलो आहे.

मराठी मध्ये स्वल्पविराम हिंदी मध्ये ‘अल्पविराम चिन्ह’ व इंग्रजीत ‘काॅमा’ असे म्हणतात.
अपूर्णविराम (:)
अपूर्णविराम चिन्ह जेंव्हा एखाद्या मुद्द्यावर तपशील द्यायचा असल्यास अपूर्णविराम (:) या चिन्हाचा वापर होतो. जसे की तुम्ही खाली दिलेले उदाहरणे पाहू शकता.
उदाहरणे :
- माझे आवडते विषय पुढीलप्रमाणे आहेत : मराठी, इतिहास आणि विज्ञान.
- आपले मुख्य ऋतू हे तीन आहेत : हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा.

आपले मुख्य ऋतू हे तीन आहेत : ✅
आपले मुख्य ऋतू हे तीन आहेत: ❌
आणि हे लक्षात घ्या की अपूर्णविराम (:) हे चिन्ह अक्षराला जोडून येत नाही.
अर्धविराम ( ; ) (इंग्रजीत Semi Colon)
जेव्हा दोन छोटे वाक्य एकमेकांना जोडायचे असते त्या वेळी अर्धविराम (;) या चिन्हाचा वापर केला जातो.
समजा तुम्हाला दोन वाक्य दिली आहेत.
पहिले वाक्य : आज आम्ही बाहेर फिरायला गेलो.
दुसरे वाक्य : पण येताना आम्हाला रिक्षा लवकर भेटली नाही.
आता या दोन वाक्यांना जोडण्यासाठी आपल्याला अर्धविराम चा वापर करावा लागेल चला तर पाहूया कसे? करायचे.
(आम्ही आज फिरायला बाहेर गेलो होतो; पण वाटेत आम्हाला रिक्षा लवकर भेटली नाही.)
उदाहरणे :
- इतक्यात, आकाशात जिकडे तिकडे ढग दिसू लागले; थोड्याच वेळाने गारांचा वर्षाव होऊ लागला; त्या गारांच्या माऱ्याने डोक्यास टेंगळे आली; अशा कचाट्यात आमची मैना सापडली.
- त्याने खूप मेहनत केली; पण त्याला योग्य ते फळ मिळाले नाही.

उद्गारवाचक चिन्ह ( ! )
लेखक आपल्या मनातील भावना दर्शवण्यासाठी उद्गारचिह्न ( ! ) वापरतात. चला तर पाहूया काही उदाहरणे.
उदाहरणे :
- अभिनंदन! अभिनंदन!
- हार्दीक शुभेच्छा!
- अरे वा! किती सुंदर आहे.
- अरे देवा! हे काय? झाले!
- बाप रे! किती मोठी पाल आहे.

आणि एका पाठोपाठ तीन उद्गारचिह्न ( !!! ) चिन्ह वापरून भावना किती तीव्र आहेत हे दाखवू शकता जसे की (ही पोस्ट तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा !!!)
प्रश्नचिन्ह ( ? )
वाक्यत प्रश्न विचारायचे असल्यास वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह (?) वापरतात.
समजा तुम्ही एक वाक्य लिहताय; वाक्यात तुम्ही प्रश्न विचारणार आहात. तर कसे लिहणार.
(1. महाराष्ट्राचे नऊ वे गृहमंत्री कोण होते.) का? (2.महाराष्ट्राचे नऊ वे गृहमंत्री कोण होते?) असे?
तुम्हाला वाक्य दोन मध्ये जसे प्रश्न चिन्ह वापरले आहे तसे तुम्हाला लिहावे लागेल. कारण वरील दोन्ही वाक्य वाचणाऱ्या व्यक्तीला कसे? समजणार कोणते? वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे कोणते साधे वाक्य.
उदा. :
- सध्याचे राज्यपाल कोन आहेत?
- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?

एकेरी अवतरणचिन्ह (‘…’)
एखाद्या शब्दावर विशेष जोर देण्यासाठी ‘एकेरी अवतरणचिन्ह’ (‘…’) चा वापर केला जातो. एकेरी अवतरणचिन्ह हे दोन उलट सुलट स्वल्पविराम सारखे दिसतात.
उदाहरणे :
- मी ‘मुख्यमंत्र्यांशी’ या विषयावर नक्की चर्चा करेन.
- मूलध्वनींना ‘वर्ण’ म्हणतात.

दुहेरी अवतरण चिन्ह (“…”)
एखाद्या व्यक्तीने बोललेले एखादे वाक्य जसे च्या तसे दाखवायचे असल्यास त्यावेळी दुहेरी अवतरण चिन्हाचा “…….” वापर केला जातो.
दुहेरी अवतरण चिन्ह (“…”) वाक्याच्या सुरुवातील दोन उलटे आणि शेवटच्या वाक्याला दोन सुलटे दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात.
उदाहरणे :
- “तो माणूस माझा छोठा भाऊ आहे.“ असे मला सीता म्हणाली
- “तो बाई माझी मोठी मामी आहे.“ असे मला आजी म्हणाली.

संयोगचिन्ह (-) याला इंग्रजी मध्ये हायपन म्हनतात आणि संयोगचिन्ह (-) हे दोन शब्द जोडताना व जोडशब्दा मध्ये येते.
जसे नवरा-बायको, आजी-आजोबा अश्या अनेक जोडशब्दा मध्ये येते.
संयोगचिन्ह (-) हे ‘किंवा’ आणि ‘ते’ अश्या अर्थाने विग्रह चिन्ह येते.
उदाहरणे :
- 4-5 (चार ‘ते’ पाच)
- 10-12 (दहा ‘किंवा’ बारा)
संयोगचिन्हाचा (-) वापर कालावधी दाखवण्यासाठी ही केला जातो.
जसे :
- 3-12-2021
- 12-12-2012
- (1920-194) या काळात. ( 1920 ‘ते’ 1947) या काळात.

एखाद्या ओळीच्या शेवटी शब्द अपुरा पडल्यास संयोगचिन्ह (-) वापरतात.
जसे :
राय-गड
अपसरण चिन्ह (—) Apsaran Viram Chinh In Marathi
अपसरण चिन्ह (—) (इंग्रजीत याला एम-डॅश असे म्हणतात) संयोग चिन्हांच्या लांबीला दुप्पट असते आणि याचा वापर एखाद्या गोष्टीचा खुलासा व स्पष्टीकरण देण्याच्या अगोदर केला जातो.
उदाहरणे :
- सुमेध-माझा मामे भाऊ- आज एक चित्र काढणार होता.

लोप चिन्ह (…)
एखादे वाक्य बोलत असताना मधेच खनडीत व थांबते तेव्हा लोप चिन्हाचा (…) वापर होतो.
उदाहरण :
- आज शाळेत जाणारच होतो की…
- आज माझे काम होणार होते पण…

विकल्प चिन्ह (/) Vikalp Viram Chinh In Marathi
विकल्प चिन्हाचा वापर एकाद्या शब्दाचे विकल्प दाखवण्यासाठी होतो जसे : ‘मी चहा किंवा काफी घेतो’ जसे या वाक्यात ‘किंवा’ च्या जागी विकल्प चिन्हाचा वापरता केला जातो.
विकल्प चिन्हाचा वापर केलेले वाक्य : मी चहा/काफी घेतो.
उदाहरणे:
- पालकांची/वडिलांची सई आनावी.
- चहा/काफी.

म्हणजे किंवा या शब्दाच्या जागी (/) स्लॅश म्हणजेच विकल्प चिन्हाचा वापर करतात.
डॉट चिन्ह (०)
शब्दाच्या संक्षिप्त रुपासमोर हे चिन्ह वापरतात:
जसे :
- डॉ० (डॉक्टर)
- प्रा० (प्राध्यापक)
- म० (महोदय)
दंड (।) आणि (।।)
दंड हे श्लोक ओवी, अभंगाच्या शेवटी दाखवतात.
उदाहरणात :
चला पंढरीशी जाऊं।
रखमादेविवरा पाहू ।।२।।
– संत तुकाराम महाराज
अधिकचा काना (आा)
जुन्या काळी एखाद्या शब्दाचे संक्षिप्त रूप लिहून अधिक चा काना वापरला जाई.
- रावसाहेबसाठी (रावसोा),
- आप्पासाहेबसाठी (आप्पासोा),
- तात्यासाहेबसाठी (तात्यासोा)
अजूनही कोल्हापूरसारख्या काही जिल्ह्यांत असेच लिहितात.
छपाई’ चिन्हे
खंजीर (‡), तारा (*), परिच्छेद चिन्ह (¶)
एखाद्या शब्दाचे किंवा वाक्याचे स्पष्टीकरण पानाच्या तळाशी येते तेव्हा एकेरी खंजीर’ नावाचे चिन्ह (†) वाक्याला लागून हे चिन्ह वापरतात.
एका पेक्षा अनेक खुलासे असतील तर तर दुहेरी खंजीर (‡), तारा (*), (¶ – पिलक्रो=परिच्छेद चिन्ह) यांचाही उपयोग करतात.
काकपद (^)
हाताने लिहीत असताना एखादा शब्द लिहायचा राहिल्या काकपद (^) हे चिन्ह ज्या जागी राहिलेला शब्द येणार होता; त्या जागी हे चिन्ह वापरून त्याच्या वर शब्द लिहले जाते.
विरामचिन्हांची उपयुक्तता दाखवणारी मराठी उदाहरणे (Examples of Viram Chinh in Marathi)
एकदा ना.सी. फडके अत्र्यांना म्हणाले, “वाक्यात स्वल्पविरामाचा नक्की उपयोग काय?” अत्रे म्हणाले, ” योग्य वेळ आली की मी ते तुम्हाला सांगीन.”
त्यानंतर लवकरच फडक्यांच्या पत्नीला अत्रे भेटले असताना अत्रे म्हणाले,
“मी तुझा नवरा तू माझी बायको आपण सिनेमाला जाऊ या.”
ही गोष्ट फडक्यांच्या कानावर आली, आणि त्यांनी अत्र्यांकडे त्याबाबत खुलासा मागितला. अत्र्यांनी स्पष्टीकरण दिले ते असे :
“अहो, मी म्हटले होते ‘मी, तुझा नवरा, तू, माझी बायको, आपण सिनेमाला जाऊ या.’
Viram Chinh FAQ
मराठी मध्ये एकूण किती विरामचिन्हे आहेत?
मराठी मध्ये एकूण 8 विरामचिन्हे आहेत.
मराठी विराम चिन्हांची नावे ? (Names of Viram Chinh in Marathi)
पूर्णविराम ( . )
स्वल्प विराम ( , )
अर्धविराम ( ; )
अपूर्णविराम ( : )
प्रश्नचिन्ह ( ? )
उद्गारवाचक चिन्ह ( ! )
एकेरी अवतरणचिन्ह ( ‘ ’ )
दुहेरी अवतरण चिन्ह ( ” ” )
संयोगचिन्ह ( – )
अपसरण चिन्ह ( – )
संयोग चिन्ह कसे असते?
संयोगचिन्ह ( – ) याला इंग्रजी मध्ये हायपन म्हनतात आणि संयोगचिन्ह ( – ) हे दोन शब्द जोडताना व जोडशब्दा मध्ये येते.
निष्कर्ष
मित्रानो मी तुम्हाला या पोस्ट मध्ये सर्व मराठी विरामचिन्ह बद्दल ची माहिती दिली आहे आणि viram chinh pdf सुद्धा दिली आहे तुम्हाला विरामचिन्ह चा नीट अभ्यास करा. कारण मराठी व्याकरण जेवढे पक्के असेल तेवढे तुमचे मार्क्स वाढतील.
या पोस्ट मध्ये काही विरामचिन्ह बद्दल व उदाहरणामध्ये चुका असतील तर कंमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा जनेकरून आम्ही ते दुरुस्त करू. या पोस्ट ला तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र.